आर्किटेक्ट दिनेश जातेगांवकर यांच्या लोगोला राष्ट्रीय पातळीवर पहिले पारितोषिक

0

नाशिक,दि.९ मे २०२३ – नाशिक येथील प्रसिद्ध वास्तुविशारद आणि आयडीया कॉलेजचे प्राध्यापक दिनेश जातेगांवकर यांनी डिजाईन केलेल्या लोगोला राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्या क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. ही स्पर्धा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर संस्थेकडून आयोजित करण्यात आली होती. या संस्थेला यंदा पन्नास वर्षे पूर्ण होत असल्याच्या यानिमित्ताने सदरची स्पर्धा घेण्यात आली होती.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इंटिरियर डिझायनर ही देशातील सर्वात मोठी आणि जुनी संस्था आहे. ही संस्था आता जातेगांवकर यांनी डिजाईन केलेला लोगो वेगेवेगळ्या प्रकारच्या संवादासाठी वापरणार आहे. या स्पर्धेत संपूर्ण देशातून आर्किटेक्टस सहभागी झाले होते. डिजाईन क्षेत्रातील अनिल सिन्हा, सरोश वाडीया आणि निरज शाह या दिग्गज लोकांच्या निवड समितीने जातेगांवकर यांच्या लोगोची निवड केली आहे.

Architect Dinesh Jategaonkar's logo won first prize at national leve

जातेगांवकर यांनी डिजाईन केलेल्या या लोगोमध्ये कथा, उत्सव आणि रंग अशी ठळक वैशिष्‍ट्ये आहेत. लोगोमध्ये अनेक दृश्य घटक वापरले आहेत. मात्र त्यांचा वापरताना अतिशय खुबीने केला गेला असून तो अतिशय वेगळा आहे. लोगोमधील सर्व घटक हे नाविन्यपूर्ण वापरले आहेत. कल्पना आणि वास्तव यांचे सुंदर एकत्रीकरण लोगोत करण्यात आलेले असल्यामुळे या लोगोची निवड केली असल्याचे समितीने स्पष्ट केले आहे.

२४ जून रोजी दिल्ली येथे या लोगो चे अनावरण तसेच विजेते वास्तुविशारद दिनेश जातेगांवकर यांचा सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!