पावसाळा संपला की ऑक्टोबर हिट ची चाहुल लागते..दिवसा कडक रणरणते ऊन तर रात्री बोचरी कडक थंडी असे दिवसाचे स्वरूप असते.त्यात परतीच्या पावसाचा मारा तो वेगळाच.अश्या या काळात नवरात्र कोजागिरी असे सण येतात ते काही उगीच नाही विशेष महत्व असलेल्या या सणांना आपण साजरे तर करतो पण हे सण याचं ऑक्टोबर महिन्यात का येतात आपण त्या दिवसात जे काही करतो ते का करतो या सर्व गोष्टी आरोग्यसंदर्भात आपणास माहिती नसतात आणी आपण या काळात उपवासात मस्त मस्त साबुदाणा चे पदार्थ तेलकट पदार्थ बनवून खातो. दुसरे म्हणजे या काळातच बऱ्याच लोकांना पित्ताचे उष्णतेचे रक्ताचे विकार जाणवतात आणि मग प्रश्न पडतो तो म्हणजे का…..? या सर्व प्रश्नाची उत्तरे देण्यासाठीच हा लेख ..या लेखात आपण लेखाच्या शीर्षका पासूनच सुरुवात करणार आहोत…पित्ताचे विकार व शारदीय विरेचन आणी रक्तमोक्षण…शारदीय का तर ऑक्टोबर महिना तर आपल्याला माहिती असतो पण शरद ऋतू आपण विसरूनच जातो.शरद ऋतूच काय सर्व मराठी महिन्यांना आयुर्वेदत अनन्यसाधारण महत्व आहे.शरद ऋतू हा आयुर्वेद दृष्टिकोनातून पित्त वाढण्याचा काळ मानला जातो किंबहुना निसर्ग व शरीर या दोहोत ही लक्षणें दिसतात सुद्धा…नुकत्याच गेलेल्या पावसाळ्यात अग्नी म्हणजे भूक मंदावलेली असते आणी वात दोष वाढून पित्त दोष शरीरात साचत असते.पित्त रक्त व स्वेद म्हणजेच घाम हे एकमेकांशी संलग्नीत पण आश्रयी असल्याने एक ज्यावेळी बिघडतो त्यावेळी सगळेच खराब होतात.अश्या या शरदातील वाढलेल्या पित्ताला खराब रक्त व घामाला दुरुस्त निर्मळ करण्याकरिता करण्यात येणारे उपक्रम ते विरेचन व रक्तमोक्षण…या लेखात आपण हे दोन्ही प्रकार म्हणजे काय..या प्रकारांची पद्धत काय असते..हे प्रकार शरीरात काय काम करतात…कोणाला हे प्रकार करता येतात…काय लक्षणें साधारण पणे दिसतात की हे प्रकार केले पाहिजे…या सर्वच प्रश्नाची उत्तरे आपण या लेखाफ् बघुयात.
१.शारदीय विरेचन व रक्तमोक्षण म्हणजे काय?
-वास्तविक असा शब्द प्रयोग कुठेहि ग्रंथात नाही पण मुख्यत: शरद ऋतूत करण्यात येते म्हणून शारदीय असा प्रघात पडला.विरेचन व रक्तमोक्षण ही दोन प्रमुख कर्मे आहेत ज्यांचा समावेश पंचकर्मात होतो.
२.विरेचन म्हणजे काय व ते करण्याची पद्धत काय असते?
-विरेचन ही शरीरातील पित्त रक्त व स्वेद म्हणजेच घाम यांना प्राकृत म्हणजेच सुयोग्य स्थितीत आणण्याची प्रक्रिया आहे ज्यात रुग्णास आधी शरीरातील खराब आम नावाचा चिकट घटक औषधाद्वारे नष्ट केला जातो व त्यांनतर रुग्णास औषधी तूप वाढत्या मात्रेत आवश्यकतेनुसार देऊन सोबत डॉक्टर त्यांना अपेक्षित लक्षणें तपासत असतात व ही लक्षणें अपेक्षित दिसताच त्या तुपाचे सेवन बंद केले जाते त्यानंतर विरेचनाकरिता ३ दिवसाचा विश्राम काल देऊन या ३ दिवसात रुग्णास पित्ताच उत्कलेश करणारा आहार दिला जातो म्हणजेच पित्त वाढवणारा आहार दिला जातो.व शेवटच्या दिवशी औषधी गोळ्या काढा अवलेह अश्या स्वरूपात विरेचन औषध देऊन जुलाब करवले जातात.यात ज्याप्रमाणे सामान्य जुलाबात थकवा जाणवतो रुग्ण गळून जातो तसे लक्षण दिसत नाही उलट रुग्णास प्रसन्न वाटणे,थकवा किरकोळ स्वरूपात जानवतो पण जर दोष व्यवस्थित पध्द्तिने जर काढले गेले तर थकवा देखील जाणवत नाही.तसे विरेचन प्रकारात सगळेच दोष काढले जातात पण मुख्यत: पित्त दोषाचे निर्हरण होते.विरेचना नंतर रुग्ण लक्षणानुसार हलका आहार देऊन हळू हळू योग्य आहारावर आणले जाते.
३.रक्तमोक्षण म्हणजे काय व त्याची पद्धत काय?
-रक्तमोक्षण हा देखील एक पंचकर्मापैकी महत्वाचा प्रकार आहे..यात रक्तातील दूषितपणा काढला जातो.रक्तमोक्षण मध्ये देखील विरेचन प्रमाणे औषधी तूप रुग्णास दिले जाते.यात ३ दिवस तूप देऊन मग रुग्णाचे रक्त सुईद्वारे काढले जाते.त्यानंतर योग्य आहार दिला जातो.
४.विरेचन रक्तमोक्षण कोणत्या अवस्थामध्ये केले जाते?
-रक्त पित्त घाम या सर्व विकृती मध्ये विरेचन रक्तमोक्षण केले जाते.अंगावर पित्त येणे,नागीन,कावीळ,हातापायची आग,डोळ्यांची आग, तळहात तळपाय घाम सुटणे, पित्त पडणे,डोके दुखणे, विविध प्रकारचे त्वचाविकार,वारंवार तोंड येणे,अतीप्रमाणात घाम येणे,मासिक पाळीचे विकार,पाळी न येणे,अत्यधीक प्रमाणात अंगावर जाणे,मायग्रेन,केस पांढरे होणे, केस गळणे,नाकातून रक्त येणे,डोळे लाल होणे इत्यादि प्रकारचे विकार अवस्थेत आपल्याला रक्तमोक्षण व विरेचन करता येते.
५.रक्तमोक्षण व विरेचन दोन्ही कर्मे शरीरात कसे काम करतात?
-दोन्ही कर्मा मध्ये घृतपान केल्यानंतर पित्त व रक्त दोष सर्व शरीरातून कोष्ठ म्हणजेच आतडयाच्या ठिकाणी आणले जातात.व तेथून ते जुलाबद्वारे बाहेर काढले जातात
६.कोणत्या वयोगटातील व्यक्तीने व रक्तमोक्षण करावे व कधी करावे?
-स्वस्थ निरोगी व्यक्तीने दरवर्षी शरद ऋतूत विरेचन रक्तमोक्षण करावे.आजारी व्यक्तीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य वेळी करावे.विरेचन कर्माकरिता वयोमर्यादा १० वर्ष ते ७० वर्षे इतकी आहे.तर रक्तमोक्षणाकरिता मर्यादा नाही.
७.दोन्ही पंचकर्म करताना त्रास होतो का ?तूप पिणे सोपे आहे का?
-सर्वात महत्वाचे कोणतीही प्रक्रिया करताना आपल्याला त्याची सर्व संपूर्ण माहिती असावी,त्याबद्दल आत्मविश्वास असावा….तसच या दोन्ही कर्माच आहे ही दोन्ही कर्मे आत्मविश्वासाने केल्यास त्याचा त्रास जानवत नाही..आणी तूप पिताना सुरुवातीला थोडा त्रास होऊ शकतो पण नंतर त्याने सवय होते…शिवाय तूप रुग्णास देण्याच्या अनेकविध पध्दती आहेत.त्यामुळे त्याचा देखील आपण अवलंब करू शकतो
सरतेशेवटी दिवाळी आहे…सण साजरे करताना आनंदाने साजरे करता यावे सगळं व्यवस्थित खाता याव याकरिता देह व्यवस्थित निरोगी स्वस्थ असायला हवा…त्यामुळे एकदा वर्षातून हे करायलाच हवे.
लेखक-
डॉ राहुल रमेश चौधरी
एम.डी.आयुर्वेद मुंबईएम ए.संस्कृत पुणे
पी.एच.डी. (स्कॉ.)
सहयोगी अध्यापक ,सप्तश्रुंगी आयुर्वेद महाविद्यालय ,नाशिक
For expert opinion available
@औदुंबर आयुर्वेद क्लिनिक,गंगापूर रोड,नाशिक
रेणुका हॉस्पिटल,जेलरोड,नाशिक
सत्ययुग आयुर्वेद हॉस्पिटल,लेखानगर, नाशिक