आता घराघरात एआय बेस्ड रोबोट काम करतील

एआय' हा आर्थिक श्रीमंतीचा सक्षम राजमार्ग : एआय तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे

0

नाशिक, दि. ११ सप्टेंबर २०२५ Artificial Intelligence Jobsयू हेट एआय ऑर यू लव एआय, बट यू कॅन नॉट इग्नोर इट!” असं ठाम प्रतिपादन करत एआय तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी सांगितलं की ‘एआय’ हा आर्थिक श्रीमंतीचा सक्षम राजमार्ग आहे.

प्रा. जोहरे म्हणाले की, एआयमध्ये वार्षिक १६७० कोटींच्या नोकऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. तरीही गरीब आणि बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना मागे ठेवण्यासाठी एआयविषयी अनेक गैरसमज पसरवले जात आहेत. एआय साठी इलेक्ट्रॉनिक्स व हार्डवेअरचे ज्ञान अत्यावश्यक असून, त्यामध्ये भारतीय विद्यार्थ्यांना सक्षम बनू नये यासाठी काही शक्ती अडथळा आणत आहेत, असा आरोप त्यांनी केला.

🔹 घराघरात एआय रोबोट (Artificial Intelligence Jobs)

आगामी काळात घराघरात एआय बेस्ड पर्सनल कस्टमाईज रोबोट काम करतील.

एआय ही केवळ संगणकीय गणिताची प्रक्रिया नसून मानवी बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता आणि डेटा विश्लेषणाचा संगम आहे.

अन्नसुरक्षितेसाठी एआय वापर वाढवून रिसर्च अँड डेव्हलपमेंटमध्ये जास्त गुंतवणूक केली तर भारत २०४७ पर्यंत ५० ट्रिलियन डॉलरची सक्षम अर्थव्यवस्था बनू शकेल.

🔹 व्याख्यानाचे ठिकाण

मराठा विद्या प्रसारक समाजाच्या केबीटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग, नाशिक येथे “कृत्रिम बुद्धिमत्ता आणि एडव्हान्सड इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजीज” या विषयावर आयोजित सेमिनारमध्ये प्रा. किरणकुमार जोहरे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत होते.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. एस. आर. देवणे होते. व्याख्यानात प्रा. जोहरे यांनी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम, माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी, पंतप्रधान नरेंद्र मोदी व माजी इस्रो चेअरमन डॉ. एम. जी. के. मेनन यांच्यासोबतच्या भेटींचे अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले.

🔹 रोजगाराच्या संधी

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या अहवालानुसार २०२५ पर्यंत एआयमुळे जगभरात ९.५ कोटी नवीन रोजगार निर्माण होतील.

भारतात एआय तज्ज्ञांचे सरासरी वार्षिक वेतन २४ लाखांपेक्षा जास्त आहे.

मशीन लर्निंग, क्वांटम कॉम्प्युटिंग, आयओटी, रोबोटिक्स, ब्लॉकचेन, मेटाव्हर्स, बायोइन्फॉर्मेटिक्स यांसारख्या तंत्रज्ञान क्षेत्रात विद्यार्थ्यांना वार्षिक ५ लाख ते १ कोटी रुपयांपर्यंत पगाराच्या नोकऱ्या मिळू शकतात.

🔹 प्रेरणा व संदेश

एआय नोकऱ्या कमी करत नाही, तर नव्या कौशल्याधारित संधी निर्माण करते. विद्यार्थी संशोधन व कौशल्य विकासाकडे वळले पाहिजेत,” असं आवाहन प्रा. जोहरे यांनी केलं.

या व्याख्यानाला महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!