दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी ‘आतिशी’यांची निवड

0

नवी दिल्ली,दि ,१७ सप्टेंबर २०२४ – विधानसभा निडणुकांपूर्वीच राजधानी दिल्लीत मोठ्या घडामोडी घडल्या असून आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्या नंतर  आपल्या पक्षातील महिला नेत्या आणि मंत्रिमंडळातील सहकारी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव दिल्लीच्या सभागृहात ठेवला आहे.मंत्री आतिशी ह्याच दिल्लीच्या मुख्यमंत्री होणार असल्याचे आता स्पष्ट झालं आहे. शीला दीक्षित यांच्यानंतर पुन्हा एकदा दिल्लीला महिला मुख्यमंत्री मिळणार आहेत.

अरविंद केजरीवाल यांनी आपला उत्तराधिकारी निवडला आहे. मंगळवारी आम आदमी पक्षाच्या विधिमंडळ पक्षांच्या बैठकीत अरविंद केजरीवाल यांनी आतिशी यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला. सर्वांनी एकमताने हा प्रस्ताव मान्य केला. अशा प्रकारे आतिशीने आता मुख्यमंत्रीपदाची शर्यत जिंकली आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत सौरभ भारद्वाज, गोपाल राय, कैलाश गेहलोत आणि राखी बिर्ला यांच्यासह अनेक नावे होती, जी आता मागे पडली .

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची वर्णी लागणार याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून सुरू होते.अरविंद केजरीवाल हे त्यांच्या पत्नीला दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदावर बसवणार आहेत, असा आरोपही भाजप नेत्यांकडून केला जात होता. मात्र भाजपाचा हा दावा आता फोल ठरला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना गतवर्षभरात मद्य धोरण घोटाळ्यात त्यांच्यावर कारवाई करत ईडीने त्यांना अटक केली होती.त्यानंतर,जामीनावर बाहेर येताच अरविंद केजरीवाल यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यानंतर, आता दिल्ली मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असलेल्या आतिशी यांच्याकडे मुख्यमंत्रीपदाचा पदभार देण्यात आला  आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी तसा प्रस्तावही सादर केला आहे. त्यानुसार, २६ आणि २७ सप्टेंबर रोजी दिल्ली विधानसभेच अधिवेशन होणार आहे. २ दिवसांच्या या अधिवेशनात नव्या मुख्यमंत्र्यांची ओळख सभागृहाला करून दिली जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.