महाराष्ट्रात सरासरी ६५ टक्के मतदान ?:नाशिक जिल्ह्यात सरासरी ६७.५७ टक्के मतदान 

नाशिक जिल्ह्यातील १५ मतदार संघातील सरासरी झालेल्या मतदानाची आकडेवारी बघा 

0

नाशिक,दि २० नोव्हेंबर २०२४ –महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे मतदान आज पार पडले राज्यात आज सरासरी ६५ .८  टक्के मतदान झाले अशी प्राथमिक माहिती आली असून अध्याप अधिकृत आकडेवारी प्राप्त झाली नाही, सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. १९९५नंतर प्रथमच एवढे मतदान झाले.आहे. नाशिक जिल्ह्यातील १५ मतदार संघात सरासरी ६७.५७ टक्के मतदान झाले आहे परंतु अद्याप अंतिम आकडेवारी रात्री उशिरा जाहीर होणार आहे.

राज्यांत या वेळी कधी नव्हे, एवढे मतदानात गैरप्रकार झाले. उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांत हाणामारी झाली. पैसे वाटपाचे आरोप झाले. बारामतीपासून चंद्रपूरपासून सर्वत्र असे प्रकार घडले. उमेदवाराला मारहाण झाली. मतदान फोडण्याचे प्रकार घडले. मतदानानंतर झालेल्या मिरवणुकीवरूनही राडे झाले.

२०१९ च्या विधानसभेला ६१.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा पाच वाजेपर्यंतचा आकडा पाहता २०१९ चा आकडा पार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढली आहे. सायंकाळी पाच वाजेपर्यंत महाराष्ट्रात सरासरी ५८.२२ टक्के मतदान झाले आहे. गेल्या वेळी २०१९ च्या विधानसभेला ६१.४४ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा पाच वाजेपर्यंतचा आकडा पाहता २०१९ चा आकडा पार झाला आहे. असे झालेच हे मतदान कोणाच्या पारड्यात, सत्ताधाऱ्यांच्या विरोधात की सत्ताधाऱ्यांच्या बाजुने असेल याचे अंदाज लावले जाणार आहेत.

नाशिक जिल्ह्यातील १५ मतदार संघातील सरासरी झालेले मतदान 

Average 65 percent voting in Maharashtra !: Average 67.57 percent voting in Nashik district

राज्यात कुणाला किती जागा? 
इलेक्टोरल एजच्या पोलनुसार :
भाजप 78
कांग्रेस 60
एनसीपी-एसपी-46
शिवसेना-उबाठा 44
शिवसेना 26
एनसीपी-अजित पवार 14
इतर 20

चाणक्य स्ट्रटेजीज् च्या पोलनुसार :  
महायुती – 152-160
भाजप – 90+
शिवसेना (शिंदे गट) 48+
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 22+
इतर – 2+
महाविकास आघाडी  – 130-138
काँग्रेस – 63+
शिवसेना (ठाकरे गट) – 35+
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 40+

पोल डायरीच्या पोलनुसार :  
महायुती – 122-186
भाजप – 77-108
शिवसेना (शिंदे गट) – 27-50
राष्ट्रवादी (अजित पवार गट) – 18-28
महाविकास आघाडी – 69-121
काँग्रेस – 28-47
शिवसेना (ठाकरे गट) – 16-35
राष्ट्रवादी (शरद पवार गट) – 25-39
इतर – 12-29

MATRIZE च्या पोलनुसार :  
महायुती 150-170
मविआ 110-130
इतर 8-10भाजप 89-101
अजित पवार 17-26
शिंदे गट 37-45
कांग्रेस 39-47
उबाठा 21-39
राष्ट्रवादी पवार 35-43

REPUBLIC च्या पोलनुसार :  
महायुती 137-157
मविआ 126-146
अन्य 2-8NEWs 24

P-MARQ च्या पोलनुसार : 
महायुती  137-157
मविआ 126-146
इतर 2-8

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.