अविनाश कुलकर्णी यांच्या चित्रप्रदर्शनाचे आज नाशिकमध्ये उदघाटन

१२ मे ते १४ मे पर्यंत सर्वात्मक कलादालनात रसिकांसाठी खुले

0

नाशिक,दिनांक १२ मे २०२३ – अविनाश कुलकर्णी यांच्या चित्रप्रदर्शनाचे आज (दि.१२ मे) नाशिकमध्ये उदघाटन होत आहे.त्यांचे हे दुसरे पोर्ट्रेट प्रदर्शन असून १२ मे २०२३ ते १४ मे २०२३ असे तीन दिवस असेल. प्रवेश विनामुल्य असलेले हे प्रदर्शन “सर्वात्मक कलादालन, स्टेट बॅंकेसमोर, बापू बंगला स्टॉप, इंदिरा नगर” येथे सकाळी ११ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत खुले राहणार आहे.

आपल्यापैकी प्रत्येकाला एक छंद असतो. पण नोकरी, व्यवसाय किंवा इतर कारणांमुळे आपण आपले छंद हवे तसे जोपासू शकत नाहीत. त्याला एक महत्वाचं कारण असतं, ते म्हणजे वेळ. आपण छंदपूर्तीसाठी वेळच देऊ शकत नाही. काही लोक तर बालपणीचे, तरुणपणीचे छंद, आवडी निवडी विसरुनही जातात. परंतु काही लोक मात्र वेळ मिळताच आपला छंद जोपासायला सुरुवात करतात. आजच्या लेखात अशाच एका व्यक्तिबद्दल सांगणार आहोत.

नाशिकचे श्री. अविनाश कुलकर्णी. हे स्टेट बॅंक ऑफ इंडियामध्ये नोकरीत होते. आठ वर्षांपूर्वी ते नोकरीतून निवृत्त झाले. पहिली काही वर्षे त्यांनी परिवार, नातेवाईक यांच्यामध्ये घालवली. दोन वर्षांपूर्वी त्यांना त्यांचा एक जुना छंद आठवला – चित्रकला, आणि त्यांनी त्याला खतपाणी घालायचे ठरवले. अनेक वर्षांपूर्वी चित्र रेखाटल्यानंतर आता पुन्हा सुरुवात करणे तसे अवघडच होते. परंतु ऑनलाईन अनेक गोष्टी उपलब्ध असतात. त्याचा फायदा अविनाश कुलकर्णी यांनी घेतला. चित्रकला तशी सोपी नसते आणि त्यात अविनाश कुलकर्णी यांनी पोर्ट्रेट काढायचे ठरवले, जे सगळ्यात अवघड असते.

एक-दिड वर्षांच्या सततच्या मेहनतीनंतर त्यांनी यात प्राविण्य मिळवले. फेब्रुवारी २०२३ मध्ये त्यांच्या पेन्सिल पोर्ट्रेटचे प्रदर्शन नाशिकरोड येथील पु. ना. गाडगीळ कलादालनात भरले होते. आठवडाभर चाललेल्या या प्रदर्शनाला लोकांनी उत्तम प्रतिसाद दिला.

परवा १३ मे रोजी अध्यत्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांचा जन्मदिवस असतो. त्याचे औचित्य साधून अविनाश कुलकर्णी आपल्या पेन्सिल पोर्ट्रेटचे दुसरे प्रदर्शन भरवित आहेत. या प्रदर्शनात अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांची काही पोर्ट्रेट्स आपल्याला बघायला मिळतील. याचसोबत लता मंगेशकर, अमिताभ बच्चन, रतन टाटा, स्मिता पाटिल, नरेंद्र मोदी अशा अनेक प्रसिद्ध व्यक्तिंची पोर्ट्रेट्सही बघायला मिळतील. प्रदर्शन दि. १२ मे २०२३ ते १४ मे २०२३ असे तीन दिवस असेल. प्रवेश विनामुल्य असलेले हे प्रदर्शन “सर्वात्मक कलादालन, स्टेट बॅंकेसमोर, बापू बंगला स्टॉप, इंदिरा नगर” येथे सकाळी ११ ते रात्रौ ८ वाजेपर्यंत खुले राहिल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!