मागच्या लेखात आपण चेहऱ्याच्या सौंदर्य बद्दल बघितले होते,या लेखात आपण नखाच्या विकारांबाबत बघूयात….आजकाल नखाच्या सौंदर्याबाबत देखील स्त्री पुरुष सजग झालेले दिसतात.याकरिता लोक manicure व pedicure पार्लर मध्ये करून घेताना दिसतात.यामध्ये भरपूर खर्च देखील करतात.परंतु जेव्हा नखाचे आजार निर्माण होतात तेव्हा असे मॅनीक्युअर वगैरे करून उपचार होत नाहीत.याकरीता योग्य तेच उपचार करावे लागतात.
नख हा दिसायला एवढासा भाग जरी असला तरी त्याचे महत्व खूप आहे.किंबहुना नखाच्या स्वरूपावरून आपल्याला शरीरात चालू असणाऱ्या आरोग्यविषयक घडामोडींचा अंदाज घेता येतो.आधुनिक उपचार पध्दतीत यशस्वी उपचार होवून रुग्ण बरे झालेले आजपर्यंतच्या प्रॅक्टीस मध्ये पाहण्यात आलेले नाही.यामध्ये आयुर्वेदात मात्र यशस्वी उपचार केले जावू शकतात.व रुग्ण बरे देखील होतात. आपले सौंदर्य पुन्हा प्राप्त करतात. नख खराब होण्याला आयुर्वेदातून कुनख असे म्हटले जते,कुलीन-चिप्प ही देखील नावे आहे.आजच्या लेखात आपण नखाची रचना नखाच्या आजारांची कारणे,उपचार,लेप,लक्षणे याची सविस्तर माहिती आपण या लेखात घेणार आहोत.
१.नख म्ह्णजे काय?
-नख हा शरीरातील कठीणभाग समजला जातो.आयुर्वेदातून नखाला पितृज अवयव मानला आहे.पितृज अवयव म्हणजे ज्यात कठीणता असते असा भाग.
२.नखाची रचना आयुर्वेदातून व आधुनिक शास्त्रानुसार कशी असते?
-आयुर्वेदानुसार नख हा आपण आतापर्यंतच्या लेखात जी सप्तधातुपरंपरा बघितली आहे,त्यामध्ये नख हा अस्थी धातु चा म्हणजेच शरीरातील हाडे तयार होतानांचा मल भाग मानला आहे.अस्थि धातु चा मलभाग व उपधातु म्हणजे केस,दात,नखे होय.आयुर्वेदानुसार प्रत्येक धातु निर्माण होत असताना त्यापासून पुढील सारवान धातु साठी योग्य भाग,उपधातु व मल निर्माण होत असतात.त्याप्रमाणेच अस्थि धातुचे होय.
आधुनिक विज्ञानानुसार नखाची रचना १३ भागात आहे,त्यापैकी…पहिला भाग म्हणजे nail plate म्हणजे मुख्य नखाचा वरचा भाग होय.दुसरा भागाला nail bed म्हणतात हा भाग म्हणजे नखाखालची त्वचा होय.तिसरा भाग म्हणजे cuticle म्हणजेच nail plate ला असणारे आवरण होय व हा भाग नखाच्या मूळाला rim तयार करून देतो.lunula हा नखाचा पुढचा भाग म्हणजेच नखाच्या मूळाशी असणारा अर्धचंद्राकार भाग होय.याव्यतिरिक्त nail folds म्हणजे संपूर्ण नखाची frame होय.याव्यतिरिक्त सर्वात महत्वाचा भाग म्हणजे matrix होय.हा भाग झाकलेला असतो परंतु या भागातूनच नखांची वाढ होते.या भागात जुने पेशी मरतात व नवीन पेशी तय्रार होतात.त्यामुळेच या भागाला महत्वाचा भाग मानलेले आहे.
याशिवाय eponcyhium,periosteum,hyponychium,flexor tendon,extensor tendon,ventral flexor ,paronychium,dorsal roof असे इतर भाग पडतात.
नखांना कठीणता ही keratin नावाच्या प्रोटीन मुळे येते.नख हे साधारणत: ०.१ मि.मि. यावेगाने अन्दाजे वाढतात.
नखाला रक्तपुरवठा असतो तो volar digital artery(radial+ulnar) द्वारे होतो.तसेच नखाला मुख्य nail plate च्या खालच्या भागाला संवेदना असतात.या संवेदना ह्या radial ulnar nerve ने तयार होणाऱ्या nerve structure ने पुरवली जातात.
३.नख विकार होण्यासाठी साधारणत: कोणकोणती कारणे असतात?
-आयुर्वेदानुसार कारणे
“नखमांसम अधिष्ठाय पित्तं वातश्च वेदनाम।
करोति दाह पाकौ च तं व्याधि चिप्पम आदिशेत॥
तदेव अक्षत रोगाख्य तथा उपनखम इति आपि।
अभिघातातात प्रदुष्टो यो नखो रुक्ष असित: खर: भवेत्त कुनख विद्यात कुलिनम इति॥“
“कुर्यात् पित्तानिलं पाकं नखमांसे सरुग्ज्वरम्।चिप्पम् अक्षतरोगं च विद्यत उपनखं च तम्॥”
“कृष्णोऽभिघातात् रुक्षश्च खरश्च कुनखो नख:”।
असे कारणे आयुर्वेद शास्त्रात आढळतात.
१.आयुर्वेद हा धातुपरंपरेच्या बाहेर नाही.त्यामुळे जो आहार विहार आपल्या प्रकृतीला योग्य नाही असा आहार-विहार सेवन केल्यास, अपचन अजीर्ण यास कारणीभूत घटकांमुळे योग्य आहाररस निर्माण होत नाही,परिणामत: पुढील रस रक्तादी धातु देखील व्यवस्थित निर्माण होत नाही.याच प्रक्रियेत सातधातु पैकी अस्थि धातु व्यवस्थित निर्माण न झाल्यास त्यापासून तयार होणारा मल भाग देखील योग्य रीतीने निर्माण होत नाही.परिणामत: नख व्यवस्थित निर्माण होत नाही.
२.शरीरातील पित्त व रक्त दूषित होणे
३.नखाच्या ठिकाणी मार ल्लागणे,नख ठेचले जाणे
४.नखांमध्ये जंतू संसर्ग होणे
५.त्वचाविकार,वातरक्त(गाऊट) यासारखे आजार चे उपद्रव किंवा परिणाम स्वरूप
६.नख वारंवार कुरतडल्याने जिव्हाळी लागून त्या ठिकाणी जखम होणे.
७.पायात घट्ट बूट अथवा सॅन्डल घालणे
८.कृत्रिम नख लावण्याची सवय
९.सार्वजनिक तरण तलावात पोहणे
१०.नखांना व नखांभोवतीच्या त्वचेला इजा होणे
११.हात –पाय खूप काळ ओलसर राहणे
१२.रोगप्रतिकारक शक्ति कमी होणे
१३.सलून ,पार्लर मधून मॅनीक्युअर पॅडीक्युअर करताना वापरलेली साधने निर्जंतुक नसणे
-आधुनिक शास्त्रा नुसार कारणे
१.colour तयार करणाचे व्यवसाय
२.शाई तयार करण्याचे व्यवसाय
३.radiator clean करण्याचे व्यवसाय
४.paint remove करणाए द्रव्य निर्माण करण्याचे व्यवसाय.
५.विषाक्तता उदा.silver,lead etc.
६.anemia
७.वेगवेगळे आजार उदा.liver disease,diabetes,kidaney diseases,lung diseases,lichen plannus,lupus erythromatous इत्यादी.
८.psoriasis
९.atopic dermatitis
१०.alopecia areata
११.काही औषधे नखांवर परिणाम करतात.उदा.sulfonamides,antibiotics,cloxacillin,dapsone,itraconazole,liothium,metoprolol,retinoids,acitretin,anticonvulsant drugs,chemotherapy drugs इत्यादी औषधे नखांवर परिणाम करतात.
याशिवाय इतर कारणे अनेक आहेत जे नखांवर परिणाम करतात.
४.नखाचे आयुर्वेद व आधुनिक पध्दतीने परिक्षण
-आयुर्वेदिय शास्त्रात दर्शन परिक्षेने च नख परिक्षण केले जाते.यात नखाचा रंग,आकृती,वेदना,स्पर्श यावरून निदान ठरवले जाते,याशिवाय सर्व आजारांची चाचपणी केली जाते.त्यानुसार उपचार केले जातात.
-आधुनिक परिक्षण
-histopathology
-local examination by microscope
-ultrasound assessment
etc.
५. आयुर्वेद व आधुनिक पध्दतीने परिक्षण केल्यास काय लक्षणे दिसतात?
-आयुर्वेदिय लक्षणे/आजार होणे
अ.नख काळे पडणे
ब.नख सारखे सारखे तुटणे
क.नख खरखरीत होणे,
ड.नखावर नख येणे(उपनख)
इ.नखाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे,जखम
ई.नखाच्या स्थानी किंवा आजूबाजूला खाज येणे,आग होणे
उ.नखाच्या आजूबाजूला बारीक बारीक पुळ्या होवून त्यातून पाणी येणे.
-आधुनिक विज्ञानानुसार खालील नखाचे आजार साधारणत: दिसतात
अ.Yellow nails-fungal infection diabetes,psoriasis,thyroid,lung diseases यामध्ये पिवळी नखे दिसतात.
ब.blue nails-cyanosis,anemia या व्याधीत निळसर नखे दिसतात.
क.green nails-bacterial infection या व्याधीत हिरवट नखे दिसतात.
ड.white nails-kidney,heart disease,diabetes,heart diseases,protein deficiency,rheumatoid arthritis,liver diseases
इ.silver-mercury-lead poisoning nails-
ई.terrys nails-liver disease,CHF,kidney failure,diabetes
उ.,rippled nails
ऊ.split cracked nails-
ए.puffy nail fold infection-
ऎ.psoriatic nail
chewed nail,white spotted nail,pale horizontal bar nail,clubbed nail(nail plate ),dark lines beneath nails(splinter haemorrhage),beaus lines(growth under cuticle due to injury),mees lines(transverse white band on nails like arsenic thallium,maliganancies,cardiac failure),clubbing ,claw nail,koilonychias(spoon shaped nails in iron deficiency anemia,hemochromatosis),leukonychia(white spotted nails),onychoisis(painless detachment of nail from nail bed),horizontyal groves caps,paronychia(infection of tissue adjacent to nail) ,onychia(infection of surrounded nail tissue),onychocryptosis(ingrown nails),onychogryposis(thickening and increased curvature of nail),onycholysis(loosening of the exposed portion of the nail from nail bed),onychomadesis(separation of nail from nail bed),onychodystrophy(deformation of nail from chemotherapy)इत्यादे लक्षणे दिसतात.
६.नखाच्या आजारांची आयुर्वेदीय पध्दतीने व आधुनिक पध्दतीने उपचार
सुरुवातीच्या प्राथमिक ओळखीच्या भागात आपण सौंदर्य उपचारा च्या अंतर्गत मॅनीक्युअर,पॅडीक्युअर याचा उल्लेख आपण केलाच…आता आपण सविस्तर उपचार पाहूयात कारण वरील दोन्ही मॅनीक्युअर,पॅडीक्युअर या शब्द रचना ह्या नखाचे प्राकृत असताना सौंदर्य वाढवण्यासंदर्भातील आहे, जेव्हा नखांचे आजार दिसतात तेव्हा मात्र योग्य त्या उपचारांची गरज भासते.येथे आपण आयुर्वेद व आधुनिक दोन्ही उपचार पध्दती बघणार आहोत.त्यातील भेद व पुर्ण योग्य चिकित्सा योग्य उपचार अर्थ जाणून घेणार आहोत.सौंदर्य वाढवताना नखांची काळजी पण घेणे अत्यावश्यक आहे.
आधुनिक पध्दतीने उपचार
१. ऍन्टीबायोटिक्स
२. स्टेरॉईडल इंजेक्शन्स
३. ऍन्टीफंगल- ऍन्टीबॅक्टेरिअल- ऍन्टीव्हायरल औषधे व लोकल ऍप्लिकेशन करिता क्रिम्स
४. मॉईश्चराईजर
५. लेसर थेरेपी
६. कॅल्शिअम सप्लीमेंट्स,बायोटीन
इत्यादी उपचार केले जातात.
आयुर्वेदानुसार नख व नखांच्या आजारांवर काय उपचार केले जातात
कुनखमपि प्रदुष्टम् एव उपक्रमेत।
“चिप्पं शोणितावसेकसंशोधनै: उपाचरेत्।……..यथयोग्य शस्त्रेन परिकर्त्वापनयेत्॥”
१.पथ्यापथ्य-
सर्वात महत्वाचे म्हणजे पथ्यापथ्य….आयुर्वेदानुसार नख हा अस्थि धातुचा उपधातु मानला आहे आणि अस्थि धातु हा वात दोषाचा आश्रयी आहे..वातदोष वाढला की अस्थि धातु चा क्षय होतो परिणामी त्याचा नखांवर देखील परिणाम होतो.त्यामुळे वातवर्धक पदार्थ खाणे टाळावे.म्हणजेच कडू,तिखट,तुरट खाणे टाळावे…थंड पाणी वापरणे-पिणे,जास्त थंडीत फिरणे –पोहणे ह्या गोष्टी शक्यतो टाळाव्यात.
२.औषधोपचार-
आधुनिक शास्त्रात सप्लिमेंट्स इत्यादी देवून वरचेवर उपचार केले जातात.तसे आयुर्वेद शास्त्रात मात्र होत नाही आजाराच्या मूळापर्यंत जावून काम करते.यामध्ये पचन संस्था व्यवस्थित करणे गरजेचे असते,तसेच वात दोषाचे अति प्रमाणात तयार होणे ह्या गोष्टी कमी करणे क्रमप्राप्त ठरते ज्यावेळॆला पचन संस्था प्राकृत होते व धातु वेळच्या वेळी व्यवस्थित तयार होतात,त्यावेळी अस्थि धातुचे म्हणाजेच हाडाचे पोषण करणारी औषधे दिल्यास योग्य असे नख प्राकृत अवस्थेत निर्माण होतात,याशिवाय नखाच्या इतर भाग हा रक्त धातु,मांस धातु निर्मित असतो अश्या वेळी त्या देखीला धातुचे योग्य शुद्धि करण होवून नखाचे विकार दूर होतात.
औषधांमध्ये सूक्ष्म त्रिफला,गंधक रसायन,लाक्षादी गुग्गुळ,अस्थिपोषक वटी,रक्तपाचक,मांसपाचक,अस्थिमज्जापाचक,स्वायंभुव गुग्गुळ,पंचतिक्तक घृत गुग्गुळ,लाक्षादी गुग्गुळ,आरोग्यवर्धिनी,कुक्कुटनखी गुग्गुळ ,पंचतिक्तक घृत,सारीवा-मंजिष्ठा वटी,रक्तचन्दन,औंदुंबर आयुर्वेद निर्मित टंकण मलहर,पिंड,कुक्कुटांडत्वक भस्म, तेल इत्यादी अनेकविध औषधे वापरून हे आजार बरे होतात.
३.पंचकर्म चिकित्सा-
नखांचा आजारांकरीता लेप,विरेचन,बस्ती हे पंचकर्म उपयोगी येतात.
यात रक्तशोधक,जंतूघ्न औषधांचे लेप केले जातात.याशिवाय वाताला नियंत्रणात आणण्याकरीता व वाताचे पोषण करून अस्थि धातु ला बळ देण्याकरीता पंचतिक्तक क्षीर बस्ती सारख्या पंचकर्मांचा उपयोग केला जातो.याव्यतिरिक्त मांस व रक्त धातुच्या दुष्टी मुळॆ नखाचा विकार असेल तर विरेचन व रक्तमोक्षण करून घेतल्यास योग्य तो लाभ होतो व नंतर औषधोपचाराने तो आजार पूर्ण बरा होतो पुन्हा उद्भावत नाही.
४.रसायन चिकित्सा
रसायन उपचारात नवीन आलेले नख चांगले वाढावेत व आधीचे नखाचे विकार पुन्हा होवू नयेत याकरीता बलवान अस्थिधातु निर्मिती होण्याकरीता योग्य रसयन चिकित्सा गरजेची ठरते.यात प्रवाळ भस्म,चुन्यचे कल्प,कुक्कुटांडत्वक् भसम,प्रवाळ पिष्टी,बाभळीचा डिंक इत्यादी रसायनांचा वापर करावा.
५.शस्त्रकर्म
नख हे खूप प्रमाणात खराब झाले असेल व नखाखाली रक्त साकळलेले असेल् किंवा नख हे मूळ भागापासून सुट्टे झाले असेल तर ते शस्त्रकर्म(minor operation) करून काढून टाकावे.त्या ठिकाणी तो भाग वेळोवेळी जंतू नाशक करून सर्जरस मलहर,जात्यादी तै,पिंड तेल् याने त्याचे ड्रेसिंग करावे(व्रणकर्म)
नखांची काळजी कशी घ्याल.
१.नख कायम स्वच्छ राहतील याची काळजी घ्या.
२.नख फार वाढवू नका.
३.नखे दातांनी सतत कुरतडू नका
४.जास्त पाण्याच्या ठिकाणी काम करणाऱ्यांनी हातात मोजे वापरा
५.नखांना आयुर्वेदिय मॉईश्चरायजर लावा.
६.खूप फीट बुट ,चप्पल,सॅंडल घालू नका
७.थंडीच्या काळात व नेहमीच हात व पाय मोजे घालावे,
८.वरील वर्णित आजार असतील तर त्याकडे वेळीच लक्ष द्या.
९.शरीराच्या सर्व धातुचे योग्य पोषण होईल यादृष्टीने चौरस आहार घ्या.
१०.नखाच्या आजूबाजूचा भाग कुरतडू नका.
डॉ.राहुल रमेश चौधरी
एम्.डी.(आयु.),मुंबई
एम.ए.(संस्कृत),पुणेसहाय्यक प्राध्यापक ,
श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यलय व रुग्णालय,नाशिक
मोबाईल-९०९६११५९३०