मायग्रेन होण्याची कारणे ; मायग्रेनवर काय आहेत उपचार पद्धती

डॉ राहुल रमेश चौधरी

0

मायग्रेन (अर्धशिशी-तीव्र शिर:शूल) आणि आयुर्वेद आजचा विषय तसा सर्वांना परिचितच……किंबहुना हा विषय बऱ्याच घरांमध्ये चर्चिला जातो,याचे कारण म्हणजे हा आजार बहुसंख्य घरांमध्ये कोणाला तरी असतोच.सांख्यिकी चा विचार करायचा झाला तर भारतात या आजाराच्या बऱ्याच प्रकारांमुळे वैविध्य आढळते.त्यामुळे मिळणारा डेटा हा अपुरा आहे,तरीदेखिल पुरुषांपेक्षा स्त्रीयांमध्ये हा आजार जास्त आढळतो.या आजाराने ग्रस्त रुग्ण अतिशय त्रस्त असतात,पण यावर आयुर्वेद उपचारपध्दती हमखास यशस्वी उपचार करते.आज याच विषयावर आपण सविस्तर चर्चा करणार आहोत.

१.मायग्रेन म्हणजे काय ?
-मायग्रेन म्हणजे साध्या सोप्या भाषेत तीव्र डोकेदुखी होय.ही डोकेदुखी अर्धे डोके दुखणे किंवा संपूर्ण डोके दुखणे,किंवा डोक्याचा मागचा भाग दुखणे यासह मळमळ,उलट्या,डोळ्यांची प्रकाशाप्रती संवेदनशीलता-आवाजाप्रती संवेदनशीलता कमी होणे,भोवळ येणे,धूसर नजर,आकलन क्षमता कमी होणे अश्या लक्षणांसह व यास्वरूपाची असते.

२.मायग्रेन होण्याची कारणे काय?
-आपण वर बघितले पुरुषांपेक्षा स्त्रीयांना या आजाराचा त्रास जास्त असतो.तसेच १० टक्के मुलांना वयात येण्याआधी या आजाराचा त्रास जास्त होतो.आपण एक नजर कारणांवर टाकूयात
अ)स्त्रीयांमधील कारणे- स्त्रीयांमध्ये सातत्याने होणारे संप्रेरक बदल(hormonal changes) हे स्त्रीयांना मायग्रेन या आजाराला कारणीभूत ठरतात.या आजाराने ग्रस्त स्त्रीयांपैकी ७० टक्के स्त्रीया या सदर कारणाने ब्रस्त असतात.यात मासिक पाळी येण्याआधी साधारणत: ३० टक्के महिलांना मुलींना हा त्रास होतो. तसेच गर्भ राहील्यानंतर दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीत या आजाराची सुरुवात बऱ्याच जणींना होते.तसेच प्रसूतीनंतर यापैकी काही महीलांचा हा त्रास तीव्र स्वरूपाचा होतो. यातच स्त्रीयांमध्ये सर्वात मह्त्वाचे कारण म्हणजे मासिक पाळी जातानांचा किंवा संपल्यानंतरचा काळ ज्याला आपण menopause म्हणतो.बऱ्याच स्त्रीयांना या काळात मायग्रेन चा प्रचंड त्रास होतो.

ब) मस्तिष्काला मार लागल्यांनतरचे दुखणे- बऱ्याच वेळेला अनेक जण पडतात,अपघात होतो,स्पोर्ट्स खेळताना दुखापत होते अश्या वेळेला मस्तिष्काला मार बसला असेल तर नंतर च्या काळात अश्या स्वरूपाची तीव्र डोकेदुखी निर्माण होते.

क)आहार- खूप खारट,आंबट खाणे,चहा-कॉफी चे प्रमाण अत्यधिक असणे,तळलेले पदार्थ मोठ्या प्रमाणावर खाणे,तिखट मिरच्या-मसाले याचा अतिप्रमाणात वापर करणे,पित्त वाढवणाऱ्या गोष्टींचे अत्याधिक सेवन करणे,फास्ट फूड चे सेवन सतत करणे,व्यसनाधीनता असणे उदा.दारू,सिगारेट,रुक्ष म्हणजेच स्नेह विरहीत जेवन इत्यादी

ड) जीवनशैली-नोकरीत कामाचे व्यस्त प्रमाण,चिंता,अस्वस्थता,रात्री उशीरा झोपणे,सातत्याने जेवणाच्या चुकणाऱ्या वेळा,मानसिक आजार,उन्हातान्हातले कामाचे स्वरूप,आगीजवळ सातत्याने काम,रात्रपाळी चे काम,लघवी-शौचास जावे लागले असे असताना न जाणे किंवा कामानिमित रोखून धरणे,खूप व्यायाम-परिश्रम करणे,हवेचे अत्यधिक सेवन करणे,मैथुन अतिप्रमाणात करणे

ई)आजाराशी निगडीत-काही वेळेला मायग्रेन अनेक प्रकारच्या आजारांशी निगडीत असतात,उदा.sleep disorder,severe injury,paralysis,dementia,alzhimer,
increase in speck number,related to eye problems,worms infestation,blood pressure,diabetes,thyroid,gastric problems,constipation ,pains related to मणक्यांचे आजार etc.

३.मायग्रेन चे प्रकार?
आयुर्वेदानुसार शिर:शूल या आजारात मायग्रेन हा प्रकार येतो ,तो अर्धावभेदक किंवा सूर्यावर्तक या नावाने येतो.दोषानुसार वातकफामुळे ,वातपित्तमुळे किंवा फक्त वाता मुळे होणारा असे प्रकार बघायला मिळतात. आधुनिक शास्त्रानुसार Migraine with aura,migraine without aura,chronic migraine,menstrual
migraine,hemiplegic migraine,migraine with brainstem aura,vestibular migraine,abdominal migraine,cyclical vomiting migraine ,headache
associated with exercise,other headache disorder असे अनेक प्रकार पडतात.

४.मायग्रेन या आजाराची लक्षणे काय?
-तीव्र डोकेदुखी
-मळमळ
-अर्धे डोके दुखणे,पूर्ण डोके दुखणे किंवा डोक्याचा मागचा भाग,कपाळ दुखणे
-उलट्या
-डोळ्याची प्रकाशप्रति संवेदनशीलता कमी होणे
-कानाची आवाजाप्रती संवेदनशीलता कमी होणे
-भोवळ येणे
-धुसर नजर
-आकलनक्षमता कमी होणॆ
-मान-भुवया-कपाळ-कान-डोळे या ठिकाणी कापल्या-सुईने टोचल्याप्रमाणे वेदना होणे
-बऱ्याच रुग्णांना सूर्य वर आल्यावर दुखणे कमी होते व रात्रि ,पहाटे खूप जास्त दुखते.
-या व्यतिरिक्त छातीत जळजळ,पोटात जळजळ,तळहात,तळपाय,डोळे आग करतात.
-काहीही खाल्ले तरी उलटी होते.
अशी लक्षणे दिसून येतात.

५.मायग्रेन आजारावर आयुर्वेदात उपचार काय??

-वर आपण हा आजार कशामुळे होतो,काय लक्षणे दिसतात हे पाहिले…आता आपण आयुर्वेदतील उपचार बघूयात.

अ) जीवनशैली- बदलती जीवनशैली हे मायग्रेन चे प्रमुख कारण दिसून येते त्यामुळे वर जी कारणे दिली आहेत्,ती टाळून व्यवस्थित पालन व्हायला हवे.

ब) आहार – विहार- खाण्यापिण्यातील गोष्टी याचे अचूक पालन झाले तर मायग्रेन बरा होण्यास ५० टक्के मदत होते.तिखट मसाल्याच्या भाज्या,आंबट –खारट -तेलकट- बेकरीचे पदार्थ इत्यादी यासारखे पथ्य पाळले गेले तर मायग्रेन आटोक्यात येतो.

क)योगा व व्यायाम- या आजारात संगीत थेरेपि.प्राणायाम,योगाभ्यास,मुद्रा,साधना,आसने यासारखे सुलभ उपचार केल्यास खूप फरक जाणवतो.

ड)पंचकर्म उपचार-नस्य,शिरोधारा,वमन,विरेचन,रक्तमोक्षण,स्नेहपान अश्या पंचकर्मानि हा आजार कायमचा जाण्यास मदत होते.

ई)औषधोपचार- हा अतिशय महत्वाचा भाग आहे,येथे रुग्णाने नियमीत औषधे वेळेवर घेतल्यास रुग्ण यातून पूर्ण सूटण्यास मदत होते.वर बघितल्याप्रमाणे आयुर्वेदातून याचे विविधतेने निदान होते त्यामुळे त्यात्या कारणांनुसार उपचार झाल्यास खूप फरक पडतो. चला तर मग शुध्द् आणि सात्विक उपचारांनी आपण मायग्रेन या आजारावर मात करूयात्,

डॉ.राहुल रमेश चौधरी
एम्.डी.(आयु.),मुंबई
एम.ए.(संस्कृत),पुणेसहाय्यक प्राध्यापक ,
श्री सप्तशृंगी आयुर्वेद महाविद्यलय व रुग्णालय,नाशिक
मोबाईल-९०९६११५९३०

Dr.-Rahul-Ramesh-Chaudhari
डॉ.राहुल रमेश चौधरी

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.