नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात दिवाळीत फटक्यावर बंदी ?

0

नाशिक – दिवाळी काहीच दिवसावर येऊन ठेपली आहे. १ नोहेंबरला वसुबारस पासून दिवाळीला सुरुवात होते. कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे यंदाच्यावर्षी सर्वसामान्यांसह दुकानदारही दिवाळीच्या तयारीला लागले आहेत.सर्व तयारी सुरु असतानाच विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात फटाक्यावर बंदी आणण्याचा प्रस्ताव महासभेत सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत. आयुक्त गमे यांच्या या प्रस्तावामुळे यंदाची दिवाळी फटाक्याविना जाणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. प्रदूर्षण रोखण्यासाठी उत्तर महाराष्ट्र विभागातील सर्व महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने फटाके विक्री आणि वापर यावर बंदी घालण्याचा ठराव मंजूर करावा,अशी सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी पत्राद्वारे केली आहे.

विभागीय आयुक्तांच्या या आदेशामुळे नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली असून व्यापारी वर्गातही नाराजीचा सूर आहे. माझी वसुंधरा अभियानाच्या प्रारूप टूलकीटनुसार हवेची गुणवत्ता राखण्यासाठी १५ ऑक्टोबरच्या आधी ठराव मंजूर करुन २२ ऑक्टोबर पर्यंत त्यासंदर्भात अधिसूचना प्रसिद्ध होणे आवश्यक असल्याच्या सूचना विभागीय आयुक्तांनी आपल्या पत्रात दिल्या आहेत.

फटाके विक्रीसाठी गाळे उभारण्याची मनपाने तयारी केली असताना विभागीय आयुक्तांच्या पत्राने प्रशासनासमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. त्यामुळे यामार्फत येणाऱ्या उत्पनालाही मुकावे लागणार आहे. कोरोना महामारीमुळे आर्थिक व्यवहार पूर्णपणे ठप्प होते. आता राज्य अनलॉक झाल्यानंतर पुन्हा एकदा अर्थचक्राला झळाळी मिळेल असं वाटलं होतं. अशातच दिवाळीत फटाक्यावर बंदी घातल्यामुळे व्यापार वर्गाच्या नाराजीलाही सामोरं जावं लागणार आहे.

विभागीय आयुक्तांच्या या पत्रानुसार आता नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नगर जिल्ह्यात ठराव झाल्यास नागरीकांना दिवाळी फटाक्यांशिवाय साजरी करावी लागणार आहे ?

नाशिक महानगर पालिकेची महासभा उद्या दिनांक २१ ऑक्टबर रोजी असल्याने या महासभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

प्रतिक्रिया 

प्रदूषणासाठी फटाकेच जबाबदार हे जे चित्र बनविण्यात येत आहे, ते खरे तर आवस्तव आहे. करोनाच्या काळात औद्योगिक, बांधकाम आणि ट्रान्सपोर्ट गतविधी जशा कमी झाल्या तसे हवेतील शुद्धतेचे प्रमाण वाढले. दिवाळीत फटाके आता फक्त १ किंवा २ दिवस उडविण्यात येतात, फटाक्यांचा खपही आता खूप मर्यादित आहेत. फटाके निर्मितीतील भारतातली सर्व मान्यताप्राप्त संस्था शासनाने आखून दिलेल्या मापदंडा नुसारच फटाके बनवीत आहे. 

एव्हढं सर्व करूनही दरवर्षी आमच्यावर बंदीचे सावट का आणले जाते? करोनाच्या पार्श्वभूमीवर राखी, पतंग, फटाके अशा सिझनल व्यवसायात अनेक छोटे विक्रेते सहभागी होत आहे. सर्व विक्रेत्यांनी आपल्या मालाचे आगाऊ आरक्षण केले आहे. ऑफ सिझन चे बुकिंग हे दिवाळी झाल्यानंतर लगेच डिसेंबर ते मार्च महिन्यांत केले जाते आणि छोटे विक्रेते नवरात्रच्या आधी बुकिंग करतात. ज्यांच्या कडे पक्के अधिकृत गोडाऊन आहे त्यांचा माल ही येऊन पडलेला आहे. फक्त १५ दिवसांआधी बंदीचा फतवा काढणे अन्यायकारक आहे. मागिल वर्षीही बंदीच्या वातावरणामुळे ग्राहकांत संभ्रम निर्माण झाला आणि त्याचा मोठा फटका विक्रेत्यांना झाला.दिवाळी फक्त २ आठवड्यांवर असतांना बंदी  करू नये.

जयप्रकाश जातेगांवकर

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.