घरामध्ये रंगणार कॅप्टन्सी कार्य ! कोणता सदस्य ठरेल कॅप्टन पदाचा पहिला उमेदवार ?

0

मुंबई-बिग बॉस मराठीच्या घरामध्ये काल एका नव्या आणि आपल्या सगळ्यात आवडत्या-जवळच्या सदस्याची एंट्री झाली आणि ती व्यक्ति म्हणजे “ आजी”. आजीने काल गोष्टींमधील जादू खरी केली आणि घरामध्ये ठेवला जादूचा दिवा. ज्या दिव्याद्वारे सदस्यांना एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी दिली. घरामध्ये पार पडले “ इच्छा माझी पुरी करा” हे नॉमिनेशन कार्य. आणि या कार्यामध्ये घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेसाठी नॉमिनेट झाले संतोष चौधरी (दादूस), विकास पाटील, आदिश वैद्य आणि मीनल शाह. आता बघूया या सदस्यांमध्ये कोण घराबाहेर जाणार आणि कोण सेफ होणार.

आज बिग बॉस मराठीच्या घरामध्ये रंगणार आहे “ चल रे भोपळ्या टुणूक टुणूक” हे कॅप्टन्सी कार्य. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमध्ये सदस्य घरामध्ये लपवलेले भोपळे शोधण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. जो एक सदस्य सर्व फेर्‍यांमध्ये भोपळा शोधून भिंत ओलांडण्यात यशस्वी ठरेल तो सदस्य कॅप्टन पदाचा पहिला उमेदवार ठरणार आहे. बघूया कोण असेल तो सदस्य.

तो डबल गेम खेळतो आहे” – विकास

काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये “इच्छा माझी पुरी करा” या नॉमिनेशन कार्यामध्ये सदस्यांना घरातील एका सदस्याला वाचविण्याची सुवर्णसंधी बिग बॉस यांनी दिली. यानुसार सदस्यांनी त्यांना जे योग्य वाटतील आशा सदस्यांना वाचवले. ज्यामध्ये आदिश वैद्यने आविष्कार दारव्हेकरला वाचवले. ज्याबद्दल आज घरामध्ये चर्चा रंगणार आहे.

विकास, सोनाली, मीनल आणि विकास याबद्दल चर्चा करताना दिसणार आहेत. विकास बोलताना म्हणणार आहे, मी त्याला विचारलं तू आविष्कारला का सेफ केलंस ? त्याने मला काहीतरी कारण दिले. मी आता असा विचार करतो आहे त्याने आविष्कारला सेफ करण्यामागे काय कारण असेल ? सोनाली म्हणाली, “मी आताच विचारलं त्याला, जे त्याने मला फिरवून सांगितलं, की मी बाकीच्या लोकांच्या डोक्यामध्ये जाण्याची स्ट्रॅटजी होती, जेणेकरून त्यांना असं वाटावं की गृप मधील सदस्य आणि माझं नीट कम्युनिकेशन झालेलं नाहीये किंवा एकीकडे विश्वास संपादन करणार कोणी नाहीये जेणेकरून मी त्या लोकांच्या डोक्यामध्ये जाईन”. विकास त्यावर म्हणाला, “तो डबल गेम खेळतो आहे.” विशाल, सोनाली आणि मीनल यांनी देखील सहमत डाखाली. विशाल म्हणाला, “जसं टिचिंग टास्कमध्ये झालं”.

आता नक्की काय घडलं, त्यांना ही चर्चा करावी असं का वाटलं ? बघा आजच्या भागामध्ये. बघूया आज घडतं बिग बॉस मराठीच्या घरामध्ये. रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.