माजी उपसरपंचाच्या आत्महत्येनंतर नर्तिका पूजा गायकवाडच्या शेवटच्या इन्स्टाग्राम पोस्टची चर्चा

0

बीड, दि. ११ सप्टेंबर २०२५ Beed Crime News गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद जगन्नाथ बर्गे (३४) (Govind Barge Suicide Case)यांच्या आत्महत्येनंतर जिल्हाभरात मोठी खळबळ माजली आहे. रविवारी मध्यरात्री त्यांनी थेट नर्तिका पूजा गायकवाडच्या (Pooja Gaikwad) घरासमोर कार उभी करून स्वतःवर गोळी झाडत जीवन संपवलं. या घटनेमागे प्रेमसंबंधातून निर्माण झालेला वाद कारणीभूत असल्याची माहिती प्राथमिक चौकशीतून पुढे येत आहे.

प्रेमसंबंधातून वाद, पैशांवरून तणाव?( Beed Crime News)

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गोविंद बर्गे व पूजा गायकवाड यांच्यात गेल्या काही महिन्यांपासून मतभेद वाढले होते. गोविंद यांच्या कुटुंबीयांनी गंभीर आरोप करताना म्हटलं की, पूजाने प्रेमाचा गैरफायदा घेत त्यांच्याकडून लाखो रुपयांची उकळपट्टी केली. प्लॉट, शेती खरेदीसाठी तसेच गेवराईतील नवीन घर आपल्या नावावर करण्याची मागणी ती सतत करत होती. यासोबतच, “जर मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर अत्याचाराचा गुन्हा दाखल करेन,” अशी धमकी दिल्याचं कुटुंबीयांचं म्हणणं आहे. या दबावामुळेच गोविंदने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं असावं, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

आत्महत्येच्या दिवशीच शेवटचं रील

आश्चर्य म्हणजे, आत्महत्येच्या दिवसाच्याच दुपारी पूजाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर तीन रील्स पोस्ट केल्या होत्या. त्यातील शेवटचं रील कृष्णा चित्रपटातील “झांझरिया” या रिमिक्स गाण्यावर नाचतानाचं आहे. त्यानंतर मात्र तिच्या अकाऊंटवर कोणतीही हालचाल आढळली नाही. हा व्हिडिओ सध्या गावोगावी चर्चेचा विषय ठरला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Pooja gaikwad (@p_o_o_j_a_1_1_0_7)

कोण आहे पूजा गायकवाड?

वय : २१ वर्षे

मूळ गाव : सासुरे, बार्शी तालुका (जि. सोलापूर)

कला प्रवास : दीड वर्षांपूर्वी बार्शी तालुक्यातील थापडी तांडा येथील कला केंद्रातून सुरुवात. नंतर पारगाव कला केंद्राशी जोडली गेली.

गोविंदशी ओळख : थापडी तांड्यातील कार्यक्रमात दोघांची भेट झाली व ती नंतर प्रेमात परिवर्तित झाली.

भेटवस्तू : गोविंदने तिला सुमारे पावणे दोन लाखांचा महागडा मोबाईल व दागिने दिले होते, अशी माहिती स्थानिकांकडून मिळते.

पुढील तपास सुरू

सध्या पूजा गायकवाड पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी तीव्र करण्यात आली आहे. गोविंद बर्गे यांच्या मृत्यूनंतर गावात व कुटुंबात हळहळ व्यक्त होत आहे. या प्रकरणात पूजावर गंभीर आरोप असल्याने तिच्या चौकशीचा अहवाल समोर आल्यानंतरच पुढील कारवाई होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!