भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर

0

नवी दिल्ली,दि,३ फेब्रुवारी २०२४ – भारताचे माजी उपपंतप्रधान आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. केंद्रातील मोदी सरकारने लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची घोषणा केली आहे. लालकृष्ण अडवाणी हे आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक आहेत आणि भारताच्या विकासात त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर ही माहिती दिली आहे.

पीएम मोदींनी ट्विटरवर लिहिले की, ‘श्री लालकृष्ण अडवाणी जी यांना भारतरत्नने सन्मानित करण्यात येणार आहे, हे कळवताना मला अतिशय आनंद होत आहे. मी त्यांच्याशीही बोललो आणि हा सन्मान मिळाल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आपल्या काळातील सर्वात प्रतिष्ठित राजकारण्यांपैकी एक, भारताच्या विकासातील त्यांचे योगदान अविस्मरणीय आहे. तळागाळात काम करण्यापासून ते उपपंतप्रधान म्हणून देशाची सेवा करण्यापर्यंत त्यांचे जीवन सुरू होते. आपले गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही त्यांनी आपला ठसा उमटवला.

लालकृष्ण अडवामी यांनी राममंदिर आंदोलनातून देशाचे राजकारण बदलून टाकले होते, भाजपचे ज्येष्ठ नेते अडवाणी यांनी १९९० मध्ये राम मंदिर आंदोलन सुरू केले होते. अयोध्येत राम मंदिर उभारण्याच्या मागणीसाठी त्यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा काढली होती. त्यांच्या रथयात्रेने देशाचे राजकारण बदलून टाकले होते. १९९२ चे अयोध्या राम मंदिर आंदोलन त्यांच्या नेतृत्वाखाली झाले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.