नाशिकमध्ये ठाकरे गटाला मोठा धक्का : ५० पदाधिकारी,कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

0

मुंबई,दि. ६ जानेवारी २०२३ – आज पासून दोन दिवसांच्या नाशिक दौऱ्यावर संजय राऊत असतांना शिंदे गटाने नाशिकच्या ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. नाशिकमधील ठाकरे गटाचे जवळपास ५० पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिंदे गटात प्रवेश केला आहे.यामध्ये विभाग प्रमुख, विधानसभा प्रमुख, यासह विविध पदावरील पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

या आधीही नाशिक दौऱ्यावर आलेल्या राऊतांची पाठ फिरताच १२ माजी नगरसेविकांनी शिंदें गटात प्रवेश केला होता.खासदार संजय राऊत आज नाशिक दौऱ्यावर जाण्याआधी ठाकरे गटाला मोठे खिंडार पडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झालेय. आताही त्यांच्या दौऱ्याच्या आधी पक्षप्रवेश होत असल्याने राऊत यांच्यावर कार्यकर्ते नाराज असल्याचे बोलले जात आहे.डॅमेज कंट्रोलसाठी उध्दव ठाकरे यांची जानेवारी अखेर सभा होणार मात्र त्या आधीच पक्षाला पुन्हा गळती लागली आहे.

२२ डिसेंबरला राऊतांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे नाशिकचे जिल्हा संपर्कप्रमुख भाऊ चौधरींनी शिंदे गटात प्रवेश केला. तर त्याआधी १२ डिसेंबरला नाशिक महानगरपालिकेतील विरोधी पक्ष नेते अजय बोरस्ते यांच्यासह १२ नगरसेवकही शिंदेंच्या गोटात दाखल झाले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे ही गळती कशी रोखणार? त्यांची काय रणनीती असणार? ते पहावं लागेल. जानेवारीच्या अखेरीस किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीला उद्धव ठाकरेंची नाशिकमध्ये जाहीर सभा होणार आहे.

दरम्यान, हा पक्षप्रवेश दिल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरातून मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी सोबत येत आहेत. चांगली सुरुवात होत आहे. नाशिकमध्ये अजय बोरस्ते, भाऊ चौधरी आणि त्यांच्या टीमने परत धडाका सुरू केला आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी काम सुरू केलं आहे, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

आपल्याला जो पाठिंबा मिळत आहे. त्याचं कारण लोकं आपल्या सरकारवर विश्वास दाखवत आहेत. आपण सर्वसामान्यांच्या मनातील सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची ही पोचपावती आहे.

आपल्या सरकारने सहा महिन्यात चांगले निर्णय घेतले आहेत. सामान्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. शिक्षकांपासून शेतकऱ्यांपर्यंतचे निर्णय घेतले आहेत. माताभगिनींच्या सन्मानाचे निर्णय घेतले आहेत, असंही त्यांनी सांगितलं.

आज मुंबई येथील बाळासाहेबांची शिवसेना भवनात नाशिक शिवसेनेच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी प्रवेश केला, याप्रसंगी महाराष्ट्र राज्य समन्वयक नरेशजी म्हस्के, सचिव भाऊसाहेब चौधरी, खासदार हेमंत गोडसे, ज्येष्ठ नेते राजू आण्णा लवटे, नाशिक मनपा विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, महानगर प्रमुख प्रवीण तिदमे, नगरसेवक सुदाम डेमसे, दिगंबर मोगरे, सचिन भोसले आदी उपस्थित होते.

या पदाधिकाऱ्यांनी केला प्रवेश
आज नाशिक ठाकरे गटाचे प्रमुख पदाधिकारी पूर्व विधानसभा प्रमुख योगेश बेलदार, शहर संघटक अनिल साळुंखे, महाराष्ट्र राज्य वाहतूक सेना महाराष्ट्र उपसचिव बापू लहूजी ताकाटे, नाशिक रोड शिवसेना समन्वयक शिवा ताकाटे, उप महानगर प्रमुख योगेश चव्हाणके, अमोल सूर्यवंशी, प्रमोद लासुरे, युवसेना उप जिल्हाप्रमुख प्रमुख रुपेश पालकर युवसेना नाशिक जिल्हा सरचिटणीस संदेश लवटे, विभाग प्रमुख नाना काळे, उमेश चव्हाण, प्रमोद जाधव, संदीप डहांके, विनोद नुनसे, शैलेश कार्ले, प्रसन्ना तांबट, अमेय जाधव, सहाय्यक संपर्क प्रमुख पश्चिम विधानसभा, महासचिव विश्व ब्राम्हण महापरिषद ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हाप्रमुख महेश जोशी, उप विभाग प्रमुख राहुल देशमुख, प्रशांत गाडगीळ, प्रशांत निचल, स्वप्नील गायकवाड, अजय निकम, राजेश गीते, महेश लोखंडे, प्रमोद काशेकर, योगेश धामणस्कर, युवसेना महानगर संघटक गोकुळ मते, युवसेना उप महानगर प्रमुख, पोलीस बॉइज संघटना जिल्हा अध्यक्ष विशाल खैरनार ,युवसेना पूर्व विधानसभा प्रसिध्द प्रमुख अंकुश बोचरे, युवसेना शहर समन्वयक आकाश काळे, युवसेना विस्तारक सोशल मिडिया राकेश झोरे, युवसेना विभाग प्रमुख मोहित पन्हाळे, अमित गांगुर्डे, समीर कांबळे, शाखाप्रमुख गणेश परदेशी, राहुल रंधे, अमोल वराडे, अनिल निरभवणे, प्रशांत निचळ, तकदीर कडवे, विशाल आहेर, आनंद गटकळ, उमेश सोनार, धीरज कडाळे यांनी प्रवेश केला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!