BIGG BOSS MARATHI S3 – बिग बॉस मराठीच्या घरात होणार हल्ला बोल

0
मुंबई – दुप्पट आव्हानं आणि दुप्पट अडथळे घेऊन काल सुरू झाला स्पर्धेचा दूसरा आठवडा. जोडी की बेडी ही आठवड्याची थीम असून काल बिग बॉस यांनी सदस्यांच्या जोड्या नेमून दिल्या आणि संपूर्ण आठवडाभर सदस्यांना या जोड्यांसोबतच रहाणे अनिवार्य असणार आहे असे जाहीर केले.काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये बर्‍याच गोष्टी घडल्या एकेमकांना सल्ले देणे, strategy सांगणे, दुसर्‍या ग्रुपमध्ये दाखल होणं, असे बरेच काही बघायला मिळाले. तसंच बिग बॉस यांनी सदस्यांनवर “नावं मोठे लक्षण खोटे” हे नॉमिनेशन कार्य सोपावले. ज्यामध्ये या आठवड्यात घराबाहेर जाण्याच्या प्रक्रियेत नॉमिनेट झाले जय, गायत्री, विशाल, विकास, आविष्कार, मीनल आणि शिवलीला. काल मीनल आणि स्नेहामध्ये मोठा वाद देखील झाला ज्यामध्ये दोघींनी आपआपले मुद्दे सदस्यांनसमोर मांडले. आज बघूया या टास्कमध्ये पुढे काय होते.
 
आज घरामध्ये होणार आहे “हल्ला बोल”… हा टास्क नक्की काय असणार आहे ? या टास्क मधून सदस्यांना काय मिळणार आहे ? हे आजच्या भागामध्ये कळेलच. पण, नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोमधून असे दिसून येते आहे की, एका टीम मधील दोन सदस्य त्या मोटर बाईक वर बसणार आहेत आणि दुसर्‍या टीममधील सदस्य त्यांना उठवण्याचा प्रयत्न करणार आहे. प्रोमोमध्ये मोटर बाईकवर बसलेली पहिली जोडी आहे सोनाली आणि सुरेखा कुडची तर दुसरी जोडी आहे विशाल आणि विकास. या बसलेल्या सदस्यांवर पाण्याचा मारा होताना दिसतो आहे, धूर देण्यात येत आहे. म्हणजेच त्यांना त्या मोटर बाईकवरुन उतरवण्यासाठी हा सगळा खटाटोप करण्यात येणार आहे. बघूया या हल्ला बोल टास्कमध्ये कोणाची टीम विजयी होणार ? आणि कोणाला हार पत्करावी लागणार.
 
 बिग बॉस मराठी सिझन तिसरा दररोज रात्री ९.३०.कलर्स मराठीवर. 
 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.