नाशिक,१९ सप्टेंबर २०२२ – अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक मतदान दि. १३ नोव्हेंबर २०२२ आणि दि. २० नोव्हेंबर २०२२ अशा या दोन मतदानाच्या तारखांची संभाव्य माहिती ही सोशल मीडियावर म्हणजे व्हाट्सअपच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहे. निवडणूक संदर्भातील कुठली ही माहिती लेखी स्वरूपात प्रमुख कार्यालयातुन अधिकृत किंवा अनधिकृत पत्र नाशिक विभागीय कार्यालयास आज पावेतो प्राप्त झाले नाही.अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक जाहीर झाली. त्यातील पहिल्या निवडणूक कार्यक्रमात नाशिकला मतदान केंद्र देण्यात आले हाेते. तर पुन्हा दुसरा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला त्यात नाशिकसह अनेक ठिकाणचे मतदान केंद्र रद्द केल्याचे दिसत असल्याने उत्तर महाराष्ट्रातील सभासदांवर हा एक प्रकारचा अन्याय असून त्यांना मतदानापासून वंचित ठेवण्याचा प्रकार असल्याचे मतदानासाठी मुंबई, पुणे किंवा काेल्हापूरला आम्ही जाणारच नाही.सगळेच जण निवडणुकीवर बहिष्कार टाकू असा पवित्रा चित्रपट महामंडळाच्या उत्तर महाराष्ट्राचे काम चालणाऱ्या समितीचे प्रमुख शाम लोंढे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
यावेळी समितीचे प्रमुख सल्लागार रमेश तलवारे ,सुनील ढगे, रवी जन्नावार, धनंजय धुमाळ, रफिक सैयद, रामेश्वर जाधव,रवी साळवे,याेगेश थाेरात, राजेश भरत जाधव, ललित कुलकर्णी, उमेश गायकवाड, दत्ता जाधव, यांच्यासह पदाधिकारी, सभासद उपस्थित हाेते. मात्र रात्री उशीरा धर्मादाय आयुक्तांनी नवीन निवडणूक कार्यक्रम देण्याचे आदेश दिल्याने आता त्या कार्यक्रमाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार परिषेदत मांडलेले मुद्दे
१ ) अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची होऊ घातलेली पंचवार्षिक निवडणूक मतदान दि. १३ नोव्हेंबर २०२२ आणि दि. २० नोव्हेंबर २०२२ अशा या दोन मतदानाच्या तारखांची संभाव्य माहिती ही सोशल मीडियावर म्हणजे व्हाट्सअपच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहे. निवडणूक संदर्भातील कुठली ही माहिती लेखी स्वरूपात प्रमुख कार्यालयातुन अधिकृत किंवा अनधिकृत पत्र नाशिक विभागीय कार्यालयास आज पावेतो प्राप्त झाले नाही.
२ ) दि. ९/११/२०१५ साली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उत्तर महाराष्ट्र विभागीय कार्यालयाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या संचालिका आणि प्रसिद्ध अभिनेत्री अलकाताई कुबल ( आठल्ये ) आणि खासदार हेमंतजी ( आप्पा ) गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले होते.आज त्याला ६/७ वर्षे पूर्ण झाली. या कालावधीत उत्तर महाराष्ट्रात चित्रपट महामंडळाचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणात करून सर्वसामान्य कलावंतापर्यंत महामंडळ पोहोचविण्याचे मोठे कार्य अविरतपणे चालु आहे. त्यातुन महामंडळाला किमान ५० ते ६० लाखांची रक्कम आज पावेतो जमा झाली आहे. १९९२/१९९३ या कालावधीत नाशिक मध्ये जेमतेम ७/८ सभासद होते त्या पैकी निर्माते दिग्दर्शक राजू फिरके ,अभिनेते व निर्माते बबनरावजी घोलप , स्वतः मी कला दिग्दर्शक शाम लोंढे , अहमद शेख , आणि काही बोटावर मोजता येतील इतकेच सभासद होते. त्यानंतर खऱ्या अर्थाने चित्रपट संस्था नाशिक मध्ये यावी यासाठी प्रयत्न सुरू झाले. पुढे कालांतराने स्वर्गीय कला दिग्दर्शक अरूण रहाणे आणि अशा अनेक सुप्रसिद्ध तंत्रज्ञ व नामवंत कलावंताचे सहकार्य लाभले. यातुनच ह्या संस्थेचे उत्तर महाराष्ट्रातील आजपर्यंत ५००० पेक्षा ही जास्त सभासद आहे. आणि उत्तर महाराष्ट्रची अ वर्ग सभासद संख्या ही २००० च्या आसपास आहे.
३ ) एवढे मोठे योगदान असतांना सुध्दा मुख्य कार्यालयाकडून दुय्यम दर्जा पदोपदी दिला जातो. तसेच नाशिकच्या कलाकारांना हिन वागणूक दिली जाते हे जाणवते. त्याचप्रमाणे मुख्य कार्यालयाकडून सभासद नोंदणीपासुन ते बाकीच्या इतर कार्यालयीन कामकाजास विलंब होतो.
४ ) आता होऊ घातलेल्या पंचवार्षिक निवडणूकाचे कुठलेही मार्गदर्शन संबंधित पत्रव्यवहार नाशिक शाखे बरोबर झालेला नाही आणि तशा अधिकृत सुचना ही मिळालेल्या नाही.एकुणच आम्हाला असे लक्षात येते की हे सर्व मंडळी एक तर आम्हाला गृहीत धरतात किंवा टाळतात. त्यातुन चित्रमहर्षि दादासाहेब फाळके यांच्या जन्मभुमी आणि कर्मभुमी असलेल्या नाशिकचा सातत्याने अपमान होतोय अशी भावना सर्व उत्तर महाराष्ट्रातील कलावंतामध्ये निर्माण झाली आहे. एकुण सर्वच पॅनेल मधील उमेदवार हे एकंमेकांचे सहकारी किंवा मित्र आहे. आम्हा सर्वच नाशिककरांची कोणा एका पॅनेलशी बांधिलकी नाही किंवा आमचे कोणाशी ही वैर नाही. यातून आम्ही उत्तर महाराष्ट्राचे हित जोपासणाऱ्या सदस्य किंवा पॅनेलच्या सोबत जाण्याचा निर्णय नाशिकच्या कलावंतानी एकजुटीने घेतला आहे.
५ ) नाशिक हे चित्रमहर्षि दादासाहेब फाळके , जेष्ठ साहित्यिक वि. वा. शिरवाडकर , जेष्ठ नाटककार वसंत कानेटकर , जेष्ठ साहित्यिक व कवी वामनदादा कर्डक तसेच मराठी भाषेला नवे शब्द देणारे स्वातंत्र्यवीर सावरकर , हुतात्मा अनंत कान्हेरे अशा साहित्यिक आणि क्रांतिविरांची नाशिक ही पुण्यभूमी आहे. यामुळे कले प्रमाणे कुठल्याही होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढणे हे आमच्या रक्तात आहे. नाशिक विभागीय शाखेला जर पुर्ण दर्जा दिला नाही तर मोठे आंदोलन करून हा लढा यापुढे अधिक तीव्र होईल.लवकरच येत्या दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रातील कलावंताच्या उज्वल भवितव्यासाठी नाशिक विभागाची नविन कमिटी स्थापन करण्यात येऊन पुढील दिशा ठरविण्यात येईल. यात चित्रपट क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देणारे आणि सामाजिक बांधिलकी व चित्रपट महामंडळाचे हित जोपासणाऱ्या नामवंत कलाकारांचा यात समावेश असेल.
हो सहमत आहे