BSNLची OTT सेवा सुरू : किंमत ४९ रुपयांपासून सुरू,हे मिळतील फायदे 

1

नवी दिल्ली,दि. १८ मे २०२३ – सध्याचे युग OTT प्लॅटफॉर्मचे युग आहे आणि आता भारत संचार निगम लिमिटेड (BSNL)देखील त्यांच्या नवीन सेवा Cinema Plus सह या बाजारात सुरु केली आहे. कंपनीच्या नवीन ओव्हर-द-टॉप (OTT) सेवेची घोषणा करण्यात आली आहे. बीएसएनएलने सिनेमा प्लसचे पॅकही जाहीर  केले आहेत. OTT प्लॅटफॉर्मवर, वापरकर्ते चार थर्ड-पार्टी सर्विस मधून स्ट्रीम  करू शकणार आहेत-Zee5, SonyLiv, YuppTV, EPICON, LIONSGATE, Shemaroo, Hungama आणि Disney Hotstar.

BSNL च्या Cinema Plus पोर्टल नुसार, BSNL ची नवीन सेवा ८ वेगवेगळ्या OTT सेवा प्रदात्यांकडून सर्विस  प्रदर्शित करेल. यासाठी कंपनीने Zee5, SonyLiv, YuppTV, EPICON, LIONSGATE, Shemaroo, Hungama आणि Disney Hotstar सोबत करार केला आहे. पॅकची किंमत ४९ रुपयांपासून सुरू होते आणि वैधता आणि OTT सेवेवर अवलंबून २४९ रुपयां पर्यंत जाते.

BSNL Cinema Plus ही आधीपासून चालू असलेल्या YuppTV ची रीब्रांडेड वर्जन  आहे, जी रु. २४९ च्या प्लॅनसह येत होती. तथापि, Cinema Plus मध्ये लोकांना निवडण्यासाठी तीन पॅक मिळतील.

बीएसएनएल सिनेमा प्लस स्टार्टर पॅक
बेस प्लॅन ४९ रुपयांचा आहे, ज्यामध्ये ShemarooMe, Hungama, Lionsgate आणि EpicOn ची सामग्री दिसेल. या प्लानची किंमत आधी ९९ रुपये होती.

बीएसएनएल सिनेमा प्लस फुल पॅक
Zee5 Premium, SonyLiv Premium, YuppTV आणि Disney Hotstar ची सामग्री सिनेमा प्लस फुल पॅकमध्ये पाहिली जाईल. प्लॅनची किंमत १९९ रुपये आहे.

बीएसएनएल सिनेमा प्लस प्रीमियम पॅक
२४९ रुपयांच्या या प्लॅनमध्ये Zee5 Premium, SonyLiv Premium, YuppTV, ShemarooMe, Hungama, Lionsgate आणि Disney Hotstar यांची सेवा उपलब्ध असेल.

सिनेमा प्लस वापरण्यासाठी तुमच्याकडे सक्रिय BSNL फायबर कनेक्शन असणे आवश्यक आहे. यानंतर तुम्हाला वर नमूद केलेल्या प्लॅनपैकी एक प्लॅन सक्रिय करावा लागेल. योजना सक्रिय झाल्यानंतर, त्या प्लॅनमध्ये उपलब्ध सेवा मिळविण्यासाठी तुम्हाला तुमच्या नोंदणीकृत फोन नंबरसह लॉग इन करावे लागेल.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] – BSNL Q-5G Launch News भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) लवकरच आपली 5G सेवा भारतात सुरू करणार […]

Don`t copy text!