मुंबई – झी मराठी अवॉर्ड्स २०२१ हा सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला.हा सोहळा प्रेक्षकांना शनिवार ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी पाहायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचे वैशिष्ठ म्हणजे सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री जीने आपल्या मनमोहक अदांनी आणि सौंदर्याने सगळ्यांना घायाळ करणारी कतरीना कैफ यांनी यावर्षी झी मराठी अवॉर्ड्सना उपस्थिती दर्शवली.यावेळी बांदेकर भावोजींनी कतरीना कैफचा पैठणी देऊन सन्मान केला.महाराष्ट्राचं महावस्त्र ‘पैठणी’ देऊन आदेश बांदेकर यांनी ‘होम-मिनिस्टर’ या कार्यक्रमाद्वारे गेली १७ वर्ष तमाम वहिनींचा सत्कार व सन्मान केला आहे.
झी मराठी पुरस्कार सोहळ्यात कतरीना कैफ आणि रोहित शेट्टी यांनी त्यांच्या आगामी सूर्यवंशी या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावली त्यावेळी भावोजींनी कतरीनाचं स्वागत अगदी मराठमोळ्या पद्धतीत, महाराष्ट्राचं महावस्त्र तिला भेट देऊन केलं. इतका मोठा सन्मान दिल्याने त्या क्षणी कतरीना भारावून गेली. तिच्या चेहऱ्यावरील आनंदचं सगळं काही सांगून जातो. हा सोहळा आणि हा सन्मान क्षण प्रेक्षकांना शनिवार ३० ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता झी मराठी अवॉर्ड्स २०२१ मध्ये पाहायला मिळेल.