ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
अश्विन शुक्ल, पौर्णिमा, दक्षिणायन, शरद ऋतू, प्लवनाम संवत्सर.
“आज चांगला दिवस, *कार्तिक स्नान आरंभ, आकाश दीपदान, अग्रयण, जेष्ठ अपत्यांस ओवाळणे, नवान्नप्राशन ”
चंद्रनक्षत्र: रेवती, मीन राशी (दुपारी १४.०२ पर्यंत) नंतर मेष राशी.
(टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही. अधिक माहितीसाठी आमच्या “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या.संपर्क – 8087520521)
मेष:- विक्री तंत्रात बदल कराल. प्रवासात त्रास संभवतो. आपत्ती येऊ शकते. सरकारी कामात घोळ नको.
वृषभ:- स्वप्ने साकार होतील. वाहनसुख मिळेल. मौलवान खरेदी होईल.
मिथुन:- सौख्य लाभेल. कामे मार्गी लागतील. प्रगतीचा वेग वाढेल.
कर्क:- राजकारणाचा त्रास होईल. गैरसमज होतील. मौन सर्वार्थे साधनम!
सिंह:- धनलाभ होईल. अकल्पित सुखद धक्का बसेल. मेहनत मात्र वाढावी लागेल.
कन्या:- ग्रहमान आज फारसे अनुकूल नाही. संवाद साधताना काळजी घ्या. करार करताना कायदेशीर सल्ला घ्या.
तुळ:- अधिकाराचा योग्य वापर कराल. आर्थिक लाभ होतील. आनंदी राहाल.
वृश्चिक:- स्पर्धेत यश मिळेल. प्रवास घडतील. वक्तृत्व गाजवाल. संदेश वहन उत्तम होईल.
धनु:- जमिनीतून लाभ होतील. मोठे व्यवहार होतील किंवा ठरतील. कुटुंबास वेळ द्या.
मकर:- चुकीचे निर्णय घेतले जाणार नाहीत याची काळजी घ्या. आर्थिक प्रगती चांगली असणार आहे. मात्र जपून पावले टाका.
कुंभ:- विचारांची खोली स्पष्ट होईल. ज्योतिष आणि गूढ गोष्टीचे आकर्षण निर्माण होईल. लेखन घडेल.
मीन:- कामाचा ताण वाढेल. त्यासाठी भ्रमंती घडेल. मात्र लाभ होतील. काही ठिकाणी माघार घ्यावी लागेल.
( कुंडलीवरून करियर, लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन, ‘राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या. “राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521)