कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये झळकला राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांचा ‘खालिद का शिवाजी’

2

मुंबई, दि. १९ मे २०२५ – Cannes Film Festival राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राज मोरे यांच्या पहिल्याच मराठी फिचर फिल्म ‘खालिद का शिवाजी’ याची निवड जगातील सर्वात प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हल २०२५ मधील ‘Marché du Film’ विभागासाठी करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाच्या फिल्म, थिएटर आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्यातर्फे अधिकृत निवड झालेला हा चित्रपट नुकताच कान्समध्ये झळकला.

मायकेल थेवर आणि सुषमा गणवीर निर्मित, तर राज प्रीतम मोरे दिग्दर्शित या चित्रपटात क्रिश मोरे ने खालिदची भूमिका साकारली आहे. यामध्ये प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलाश वाघमारे आणि स्नेहलता तागडे यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. कैलाश वाघमारे लिखित संवादांना राजकुमार तंगडे यांनी शब्दबद्ध केले असून, विजय मिश्रा यांनी छायाचित्रण (DOP) केले आहे.

सामाजिक विषयावर भाष्य करणारी कथा
ही कथा आहे पाचवीत शिकणाऱ्या खालिद नावाच्या मुलाची. खालिदच्या मनात निर्माण होणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांचा शोध घेत तो शिवाजी महाराज आणि त्यांच्या विचारांपर्यंत पोहोचतो. सामाजिक भेदभावावर भाष्य करणारी ही कथा आजही अनेक मुलं, कुटुंबं आणि समाजातील व्यक्तींना स्पर्शून जाते. खालिद एका सत्यशोधकाच्या भूमिकेत जातो आणि समतेचा विचार मांडणाऱ्या शिवाजी महाराजांचा शोध घेतो.

इतर महोत्सवांतील यश (Cannes Film Festival)
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाची निवड याआधीही अनेक चित्रपट महोत्सवांमध्ये झाली आहे:

इफ्फी इंडियन पॅनोरमा – एनडीएफसी फिल्म बाजार २०२४ (गोवा)

अजंठा – एलोरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ (India Focus Special Screening)

Fripresci India Grand Prix Award 2025 – नामांकन

दिग्दर्शक राज मोरे यांची प्रतिक्रिया
दिग्दर्शक राज मोरे म्हणतात, “ही माझी पहिली फिचर फिल्म असून, या चित्रपटावर मी २-३ वर्षं मेहनत घेतली आहे. माझ्या टीमचे आणि निर्मात्यांचे मी आभार मानतो. कान्ससाठी निवड होणं ही फार मोठी गोष्ट आहे. आता राष्ट्रीय पुरस्काराचीही आशा वाटू लागली आहे. हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहोत.”

राज मोरे यांना याआधी ‘खिसा’ (२०२०) या लघुपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार, तसेच ‘बिच्छौल्या’ (एमआयसीएफएफ २०२३) साठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार मिळाला होता.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] जसे प्रेक्षकांची मने जिंकली, तसाच इंटरनेटवर खळबळ माजवणारा ठरला कियारा अडवाणीचा […]

  2. […] गोष्ट सांगणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून त्याला […]

Don`t copy text!