नवी दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदीया यांच्या घरी सीबीआय ने छापे टाकले आहेत.याबद्दल खुद्द सिसोदिया यांनीच ट्विट करत माहिती दिली आहे.सीबीआयकडून सध्या एकाच वेळी २० ठिकाणी छापमारी करण्यात येत आहे.दिल्ली सरकारच्या शिक्षण खात्यात घोटाळा झाल्याचा सीबीआयला संशय आहे. दिल्लीतल्या शाळांमध्ये २००० कोटींचा घोटाळा झाल्याचं बोललं जातं. त्या प्रकरणी सिसोदिया यांची चौकशी केली जात आहे.
लेफ्टनंट गव्हर्नर व्हीके सक्सेना यांनी अलीकडेच सिसोदिया यांच्या विरोधात सीबीआय चौकशीची शिफारस केली होती. मुख्य सचिवांच्या अहवालानंतर त्यांनी ही शिफारस केली आहे. या अहवालात उपमुख्यमंत्र्यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे.
हम सीबीआई का स्वागत करते हैं. जाँच में पूरा सहयोग देंगे ताकि सच जल्द सामने आ सके. अभी तक मुझ पर कई केस किए लेकिन कुछ नहीं निकला. इसमें भी कुछ नहीं निकलेगा. देश में अच्छी शिक्षा के लिए मेरा काम रोका नहीं जा सकता.
— Manish Sisodia (@msisodia) August 19, 2022
“सीबीआयचं आमच्या घरी स्वागत आहे. चौकशी दरम्यानं आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य करू, जेणे करून सत्य लवकरच सर्वांसमोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक केसेस करण्यात आल्या आहेत. पण त्यातून काहीही बाहेर आलं नाही. मला पूर्ण विश्वास आहे की या छापेमारीतूनही काहीच साध्य होणार नाही. मी मुलांच्या चांगल्या शिक्षणासाठी प्रयत्नशील आहे. अन् त्याला कुणीही रोखू शकत नाही”, असं ट्वीट सिसोदिया यांनी केलं आहे. आम्ही कट्ट्र ईमानदार आहोत. लाखो बालकांच्या उज्वल भविष्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. चांगल्या कामात अडथळे आणले जात आहेत. म्हणून आपला देश पहिल्या क्रमांकावर पोहचू शकत नाही, असंही सिसोदिया म्हणाले आहेत.
केजरीवालांचा केंद्रावर निशाणा
सिसोदिया यांच्या घरावर सीबीआयच्या छाप्याबाबत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल म्हणतात की, दिल्लीचे शिक्षण आणि आरोग्य मॉडेल बंद करण्यासाठी हा छापा टाकण्यात येत आहे. ते म्हणाले, ‘संपूर्ण जग दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्य मॉडेलबद्दल बोलत आहे. त्यांना हे थांबवायचे आहे. त्यामुळेच दिल्लीच्या आरोग्य आणि शिक्षण मंत्र्यांवर छापेमारी आणि अटक. ७५ वर्षात ज्याने चांगले काम करण्याचा प्रयत्न केला त्याला रोखले गेले. त्यामुळे भारत मागे राहिला. दिल्लीची चांगली कामे थांबू देणार नाही असे हि केजरीवाल म्हणाले .
दिल्ली के शिक्षा और स्वास्थ्य मॉडल की पूरी दुनिया चर्चा कर रही है।इसे ये रोकना चाहते हैं।इसीलिए दिल्ली के स्वास्थ्य और शिक्षा मंत्रियो पर रेड और गिरफ़्तारी
75 सालों में जिसने भी अच्छे काम की कोशिश की,उसे रोका गया।इसीलिए भारत पीछे रह गया
दिल्ली के अच्छे कामों को रुकने नहीं देंगे
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) August 19, 2022