छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण

0

नाशिक,२८ मार्च २०२३ – नाशिकसह राज्यात पुन्हा कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. राज्यात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत असल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ  यांच्या प्रकृतीबाबत मोठी माहिती समोर आली आहे. छगन भुजबळ यांना कोरोनाची लागण झाली आहे.आपण कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती खुद्द छगन भुजबळ यांनी ट्विट करून दिली आहे.

काल येवला येथून परतत असताना त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.यावेळी त्यांची कोरोनाची टेस्ट करण्यात आली होती. आज या टेस्ट चा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.आता त्यांची प्रकृती स्थिर असून ते नाशिक येथील घरी विश्रांती घेत आहेत.

छगन भुजबळ हे काल नाशिकहून येवला येथे शहीद जवान अजित शेळके यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी गेले होते. जवान शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेतल्यानंतर ते येवला येथील निवासस्थानी गेल्यानंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर ते येवल्याहून नाशिकमध्ये परतले. थंडी, ताप असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर तपासणी केली असता कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले आहेत.

सद्यस्थितीत त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती छगन भुजबळ यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे. पुढचे काही दिवस घरीच विश्रांती घेणार असल्याचे समजते आहे. येवला  तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीर जवान अजित शेळके यांना नुकतेच देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात वीरमरण आले. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी काल सकाळी वीर जवान अजित शेळके यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यानंतर संध्याकाळी छगन भुजबळ यांची प्रकृती अचानक बिघडली. लागलीच त्यांना नाशिक येथील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. यात ते कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

नाशिकमध्ये कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ
गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्ह्यात एच3 एन2 (H3N2) या नवीन विषाणूसह कोरोना वाढू लागला आहे. नव्या विषाणूच्या रुग्णामधून नव्याने कोरोनाबाधित  रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे. आरोग्य विभागाने कोरोनाचे सातत्याने रुग्ण वाढत असताना जोडीला एच3 एन2 या नवीन विषाणूचेही आढळून येत असल्याने केंद्रासह राज्य सरकारने सतर्कतेचे आवाहन केले आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.