“राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांचा उद्या नाशिक दौरा”

शहर,जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोषात स्वागताचा कार्यक्रम

1

नाशिक | दि. २१ मे २०२५ – Chhagan Bhujbal Nashik Visit महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री म्हणून नुकतेच नियुक्त झालेले छगनराव भुजबळ गुरुवार, दिनांक २२ मे २०२५ रोजी आपल्या पहिल्या नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने इगतपुरी, नाशिक शहर, विंचूर आणि येवला येथे भव्य स्वागत कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

या दौऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) तर्फे मंत्री भुजबळ यांचे ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत करण्यात येणार असून, कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन शहराध्यक्ष रंजन ठाकरे, जिल्हाध्यक्ष अॅड.रविंद्र पगार आणि विष्णूपंत म्हैसधुणे यांनी केले आहे.

दौऱ्याचा कार्यक्रम पुढीलप्रमाणे:(Chhagan Bhujbal Nashik Visit)
सकाळी ११ वाजता: इगतपुरी – हॉटेल ग्रीन लॅन्ड समोरील हायवेवर स्वागत

१२ वाजता: नाशिक – मुंबई नाका येथील राष्ट्रवादी भवनात स्वागत आणि कार्यकर्त्यांशी संवाद

३.३० वाजता: येवला – आगमन

४.३० वाजता: विंचूर, ता. निफाड – स्वागत

५.०० वाजता: येवला संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांशी संवाद

पालकमंत्री पदाची जोरदार मागणी:
छगन भुजबळ यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर लगेचच नाशिकचे पालकमंत्रीपद त्यांना मिळावे, अशी जोरदार मागणी सुरु झाली आहे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे बॅनरद्वारे तसेच दुग्धाभिषेक करून साकडे घालून ही मागणी केली आहे.

भुजबळ यांनी यापूर्वी अनेकदा नाशिकच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळली असून, कुंभमेळा २०२७ च्या पार्श्वभूमीवर त्यांच्या अनुभवाचा जिल्ह्याला मोठा फायदा होऊ शकतो, असे मत विविध राजकीय व सामाजिक वर्तुळातून व्यक्त होत आहे.

राजकीय पार्श्वभूमी:
महायुती सरकारमध्ये मंत्रिपद न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते. त्यांनी अनेकदा आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली होती. मात्र, त्यांच्या राजकीय अनुभव, पक्षनिष्ठा आणि जनाधाराचा विचार करून अखेर त्यांना मंत्रिपद बहाल करण्यात आले. उद्या त्यांच्या खात्याबाबत अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

निष्कर्ष:
छगन भुजबळ यांच्या नाशिक दौऱ्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. जिल्ह्याच्या विकासासाठी त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यांच्या पालकमंत्री पदाच्या शक्यतेबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

1 Comment
  1. […] “राज्याचे कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ … […]

Don`t copy text!