छगन भुजबळ यांनी कॅबिनेटमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर नाशिकमध्ये जल्लोष

2

नाशिक, दि. २० मे २०२५ – Chhagan Bhujbal News  राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी आज राज्याच्या कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतली. या घडामोडीमुळे संपूर्ण नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

शपथविधीनंतर भुजबळ फार्म कार्यालय तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे मुंबई नाका येथील कार्यालय येथे कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटप करत जल्लोष केला.

🏛️ नेतृत्वाला मानाचा मुजरा
या वेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचे आभार मानले की, त्यांनी छगन भुजबळ यांना पुन्हा मंत्रीमंडळात स्थान दिले.

🙌 उपस्थित मान्यवर आणि कार्यकर्ते (Chhagan Bhujbal News)
या जल्लोषात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद यांच्या अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. उपस्थित मान्यवरांमध्ये हे प्रमुख चेहरे होते:

नानासाहेब महाले (ज्येष्ठ नेते)

गोरख बोडके (प्रदेश पदाधिकारी)

अंबादास खैरे (युवक शहराध्यक्ष)

कविता कर्डक (शहराध्यक्षा)

प्रेरणा बलकवडे (महिला जिल्हाध्यक्षा)

योगेश निसाळ, संजय खैरनार, पूजा आहेर, आशा भंदुरे, संतोष भुजबळ, नाना पवार, रवि हिरवे, अनिल नळे, रेहान शेख, नाना नाईकवाडी, इत्यादी.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. श्री छगन भुजबळ साहेब अभिनंदन

Don`t copy text!