वाढदिवसानिमित्त छगन भुजबळ यांचा नेत्रदानाचा संकल्प….

0

नाशिक – राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांचा ७४ वा वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमाद्वारे नाशिक येथील कार्यालयात साजरा करण्यात आला. यावेळी नेत्रदान शिबीर, रुग्णवाहिका लोकार्पण, अंध बांधवाना साहित्याचे वाटप,  पुस्तक व वेबसाईटचे प्रकाशन यासह विविध कार्यक्रम पार पडले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्त आज भुजबळ फार्म नाशिक येथील कार्यालयात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, कृषी मंत्री दादाजी भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार दिलीप बनकर, आमदार नितीन पवार, आमदार हिरामण खोसकर, आमदार सरोज आहिरे, आमदार सुनील भूसारा, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी आमदार जयवंतराव जाधव, माजी आमदार वंसत गिते, माजी आमदार दिपिका चव्हाण, संजय चव्हाण, निर्मला गावित, माजी केंद्रीय मंत्री विजय नवल पाटील, माजी मंत्री शोभा बच्छाव, एमव्हीपी संस्थेच्या सरचिटणीस नीलिमा पवार,  जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षिरसागर, उपाध्यक्ष डॉ.सयाजीराव गायकवाड, सभापती संजय बनकर, अश्विनी आहेर, नयना गावित, मनपा गटनेते गजानन शेलार, मनपा स्थायी समिती सभापती गणेश गिते, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, डॉ.तुषार शेवाळे, शरद आहेर, माजी उपमहापौर प्रथमेश गीते, शिवसेना संपर्क प्रमुख अजय चौधरी, माजी महापौर विनायक पांडे, जिल्हा प्रमुख विजय करंजकर, सुनील बागुल, दत्ता गायकवाड, नगरसेवक सुधाकर बडगुजर, विलास शिंदे, शाहू खैरे, मुकेश शहाणे  यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.

Chhagan Bhujbal's decision to donate eyes on the occasion of his birthday ....

यावेळी मंजिरी धाडगे, डॉ.कैलास कमोद, दिलीप खैरे, बाळासाहेब कर्डक, नानासाहेब महाले, अॅड.रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड,विष्णुपंत म्हैसधूने, विजय राऊत, जयप्रकाश जातेगावकर, प्रा.शंकर बोऱ्हाडे, राजेंद्र डोखळे, ऍड.सुभाष राऊत, ऍड. नितीन ठाकरे, प्रा.बाळासाहेब पिंगळे, समाधान जेजुरकर, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, अनिता भामरे, उदय जाधव, सचिन पिंगळे, संतोष सोनपसारे, गोरख बोडके यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसेच फोन व सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या.

अमृत महोत्सवी वर्षानिमित्त ७५ लाख नागरिकांचे नेत्रदान करण्याची मोहीम

मंत्री छगन भुजबळ यांच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने वर्षभरात ७५ लाख नागरिकांचे नेत्रदान करण्याची मोहीम सुरु करण्यात आली आहे. या मोहिमेचा शुभारंभ आज करण्यात आला. त्यासाठी स्वतंत्र नोंदणी कक्षाची निर्मिती करण्यात आलेली आहे. या मोहिमेत स्वतः मंत्री छगन भुजबळ यांनी आपला सहभाग नोंदवीत नेत्रदानाची नोंदणी केले आहे.

रुग्णवाहिकेचे लोकार्पण 

 

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसानिमित्ताने अतुल मते युवा मंच आडगाव व माजी नगरसेवक हरिष भडांगे यांच्या दोन रुग्णवाहिकांचे मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

 

अंध बांधवांना उपयोगी साहित्याच्या किटचे वाटप 

 

जागतिक अंधदिनाच्या निमित्ताने व राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मेट भुजबळ नॉलेज सिटीच्या वतीने अंधबांधवांना मिठाई, कपडे तसेच इतर विविध उपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

‘ओबीसी आरक्षणाचा संघर्ष’ पुस्तिकेचे प्रकाशन

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे शहर कार्याध्यक्ष तथा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या ओबीसी सेलचे अध्यक्ष समाधान जेजुरकर यांच्या ‘ओबीसी आरक्षणाचा संघर्ष’ या पुस्तिकेचे प्रकाशन पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले.

मंत्री छगन भुजबळ यांच्या वेबसाईटचे लोकार्पण…

 

मंत्री छगन भुजबळ यांच्या कार्याचा आढावा घेणारी अद्यावत वेबसाईट सुरू आज सुरू करण्यात आली. मंत्री छगन भुजबळ यांच्याबद्दल  chhaganbhujbal.in या वेबसाईटवर सर्व माहिती पाहता येणार आहे. छगन भुजबळ यांच्या कार्याचा आढावा घेणारी अद्यावत अशी वेबसाईट बनविण्यात आली आहे या माध्यमातून त्यांचे कार्य जनतेपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.