कॅन्सरग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले बालकलाकार

0

नाशिक,दि.१८ मे २०२३ – उद्या दिनांक १९ मे रोजी कालिदास कलामंदिर येथे संध्याकाळी ६.३० वाजता झुंजार या बालनाट्याचा प्रयोग होणार आहे. कॅन्सर हा या नाटकाचा विषय असून या नाटकातून जमा होणारा संपूर्ण निधी हा कॅन्सर रुग्णांच्या उपचारासाठी दिला जाणार आहे.कॅन्सर हा आजार आपल्या कुटुंबात, ओळखीत कुणालाही होऊ शकतो. प्रत्यक्ष / अप्रत्यक्ष या रोगाशी संबंध येत असल्याने कॅन्सर या आजाराबाबत असणारी भीती कमी व्हावी, मनोबल उंचावले जावे हा या प्रयोगामागचा हेतू आहे. नाटकाचा विषय जरी कॅन्सर असला तरी तो रडकथेसारखा न मांडता मनोरंजक पद्धतीने आणि प्रेरणादायी ठरेल या स्वरूपात मांडला गेल्याचे “झुंजार”चे लेखक/ दिग्दर्शक कल्पेश कुलकर्णी यांनी सांगितले.

या नाटकात स्नेहा गायकवाड, भार्गव जोशी, वरद अत्रे, देवगंधा भागवत, स्पंदन सूरते, स्वरा दोंदे, चिन्मय पाठक, स्वानंद पाठक, आरव देशपांडे, सावरी वाघमारे या बालकलाकारांच्या भूमिका आहेत. जय खोरे (पार्श्वसंगीत), चैतन्य गायधनी (प्रकाश योजना), ऋषीकेश पाटील, मुकेश काळे (नेपथ्य), स्वरांजली गुंजाळ (रंगभूषा), नेहा उपाध्याय (वेशभूषा) यांनी तांत्रिक बाजू सांभाळली आहे.चिमुकल्यांच्या सामाजिक जाणिवेतून केल्या गेलेल्या या प्रयत्नाची सर्वत्र चर्चा होत आहे

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!