राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबर पासून सुरु होणार

0

मुंबई– गेल्या अनेक दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी होतांना दिसतो आहे.त्यामुळे राज्यसरकारने
राज्यात करोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर हॉटेल, मॉल, मंदिरं यांसह अनेक सार्वजनिक ठिकाणं निर्बंधांसह सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र या सगळ्यात चित्रपटगृह आणि नाट्यगृहांना परवानगी देण्यात आली नव्हती.परंतु आज राज्यसरकाने चित्रपटगृह आणि नाट्यगृहांबाबत मोठा निर्णय घेतला असून येत्या २२ ऑक्टोबर पासून राज्यातील चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

मनोरंजन क्षेत्रातील प्रतिनिधींच्या मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीत नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरू करण्याला हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.आज टास्क फोर्स सदस्य, खासदार संजय राऊत, मुख्य सचिव सीताराम कुंटे, अतिरिक्त मुख्य सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास तसेच निर्माते रोहित शेट्टी, कुणाल कपूर, मकरंद देशपांडे, सुबोध भावे, आदेश बांदेकर व नाट्य क्षेत्रातील मान्यवरांशी मुख्यमंत्र्यांनी बैठकीत चर्चा केली. इतर सार्वजनिक ठिकाणांप्रमाणेच चित्रपटगृह आणि नाट्यगृहांसाठीही खास नियमावली असेल.ती लवकरच जाहीर करणार असल्याचे सांगण्यात आले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.