कोरोना लस घेतलेल्यांना धोका ? लसीमुळे होऊ शकतात साईड इफेक्ट 

अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात प्रथमच दिली कबुली :जगभरात खळबळ 

0

नवी दिल्ली,दि,३० एप्रिल २०२४ –चार वर्षांपूर्वी जगभरात कोरोना विषाणूने धुमाकूळ घातल्यानंतर कोरोनाचा फैलावास रोखण्यासाठी  व्यापक प्रमाणावर लसीकरण करण्यात आले होते. भारतातही अल्पावधीत कोट्यवधी लोकांना कोरोनाच्या लसीचे दोन डोस देण्यात आले होते.दरम्यान करोना विषाणूविरोधात वापरण्यात आलेल्या कोव्हिशिल्ड लसीचे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होऊ शकतात, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने ब्रिटनमधील एका न्यायालयात दिली आहे. गेल्या चार वर्षात अ‍ॅस्ट्राझेनेकाने पहिल्यांदाच अशी कबुली दिल्याने आता जगभरात याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, कोरोनाची लस आणि तिच्यापासून होणाऱ्या अपायांबाबतही खूप चर्चा झाली होती. आता ऑक्सफर्ड-एस्ट्राजेनेका कोरोना लसीबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही लस तयार करणाऱ्या एस्ट्राजेनेका कंपनीने युनायटेड किंग्डमच्या उच्च न्यायालयामध्ये काही कागदपत्रं दिली असून, त्यामधून या कंपनीने त्यांच्या कोविड-१९ लसीमधून टीटीएससारखा दुर्मीळ आजार होऊ शकतो, असा दावा केला आहे. एस्ट्राजेनेका लसीची अनेक देशांमध्ये कोविशिल्ड आणि वॅक्सजेवरिया या नावांनी विक्री करण्यात आली होती.

द इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, अ‍ॅस्ट्राझेनेकाने ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या मदतीने तयार केलेल्या कोव्हिशिल्ड लसीमुळे मानवी शरीरावर दुष्पपरिणाम होत असल्याचा दावा ब्रिटनमधील जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने केला होता. तसेच त्याने अ‍ॅस्ट्राझेनेका कंपनीविरोधात तेथील न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

थ्रोम्बोसायटोपेनिया सिंड्रोम (अर्थात टीटीएस) शरीरामध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होण्यास कारणीभूत ठरतो.त्यामुळे एखाद्या व्यक्तीला ब्रेन स्ट्रोक, कार्डियक अरेस्ट होण्याची शक्यता वाढते. त्याशिवाय हा सिंड्रोम शरिरामध्ये बॉडी प्लेटलेट्सचं प्रमाण कमी होण्यासही कारणीभूत ठरतो.

एस्ट्राजेनेका कंपनीला सध्या क्लास अॅक्शन खटल्याचा सामना करावा लागत आहे. हा खटला जेमी स्कॉट नावाच्या एका व्यक्तीने दाखल केला आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठासोबत मिळून तयार करण्यात आलेली एस्ट्राजेनेकाची लस घेतल्यानंतर जेमी स्कॉट हे ब्रेन डॅमेजची शिकार झाले होते. त्याशिवाय इतरही काही कुटुंबांनी अशा शारीरिक तक्रारींचा सामना करावा लागत असल्याचे सांगत त्याविरोधात कोर्टात धाव घेतली होती. आता या कुटुंबांकडून लसीमुळे झालेल्या त्रासाची भरपाई म्हणून नुकसान भरपाईती मागणी करण्यात येत आहे.

या याचिकेवर उत्तर देताना कोव्हिशिल्ड लसीमुळे थ्रोम्बोसाइटोपेनिया सिंड्रोमची लक्षणे आढळू शकतात, ज्यामुळे शरीरात रक्ताच्या गाठी तयार होऊन,हृदयविराकाराचा झटका येऊ शकतो किंवा ब्रेन हॅम्रेज होऊ शकतो, अशी कबुली अ‍ॅस्ट्राझेनेकाने न्यायालयात दिली. मात्र हे दुष्परिणाम क्वचितच आढळू शकतात, त्यामुळे नागरिकांना घाबरू नये, असेही कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!