भारतात पुन्हा कोरोनाचा प्रकोप !१२५२ सक्रिय रुग्ण,राज्यात ७६ नवीन रुग्णांची नोंद

देशात १३ जणांचा मृत्यू कोरोनाचे नवे प्रकार आणि रुग्णवाढीचा धोका वाढतोय!

0

नवी दिल्ली,दि ३० मे २०२५Coronavirus India 2025 भारतामध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे संकट डोकं वर काढत आहे. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या १२५२ वर पोहोचली असून आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गुरुवारी ७६ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या ५९७ झाली आहे.

राज्यातील रुग्णवाढ – जिल्हानिहाय माहिती
पुणे: २१
ठाणे: १२
कल्याण-डोंबिवली: ८ देशात
नवी मुंबई: ४
कोल्हापूर: १
अहिल्यानगर: १ १३ जणांचा मृत्यू
रायगड: २
या अहवालानुसार एका रुग्णाचा मृत्यूही नोंदविण्यात आला असून राज्यातील मृतांची संख्या ७ झाली आहे.

कोरोनाचे लसीकरण असूनही संसर्ग कसा?
लस घेतलेल्या लोकांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. कारण नवीन प्रकारांवर लसीकरण पूर्णतः प्रभावी नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. तरीही लस घेतल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती सुधारते आणि गंभीर लक्षणे टळू शकतात.

कोरोना रुग्णसंख्येतील वाढीमागे कोणता प्रकार?
तज्ज्ञांच्या मते, JN.1 विषाणूच्या उत्परिवर्तनामुळे तयार झालेल्या NB.1.8.1 आणि LF.7 या उपप्रकारांमुळे रुग्णसंख्या वाढत आहे. WHO ने NB.1.8.1 विषाणूबाबत देखरेखीचा इशारा दिला असून तो अधिक वेगाने पसरतो. यामध्ये A435S, V445H, T478I हे स्पाइक प्रोटीन म्युटेशन्स आढळतात.

भारतामध्ये कोविड-१९ चे ४ नवीन प्रकार आढळले (Coronavirus India 2025)
ICMR च्या माहितीनुसार भारतात सध्या आढळणारे चार प्रमुख प्रकार:

JN.1 – सर्वाधिक सामान्य
NB.1.8.1
LF.7
XFG
या प्रकारांचे प्रकरणे मुख्यतः दक्षिण व पश्चिम भारतातून समोर आली आहेत.

तज्ज्ञांचे मत: घाबरू नका, पण सतर्क राहा
WHO ने हे प्रकार चिंताजनक गटात न ठेवता “देखरेखी खालील” प्रकार म्हणून वर्गीकृत केले आहेत. मात्र, ते चीन व इतर आशियाई देशांमध्येही वाढत आहेत, त्यामुळे नागरिकांनी आरोग्य विषयक खबरदारी बाळगणे आवश्यक आहे.

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!