नाशिक दिनांक – २८ मे २०२५ – Coronavirus Update Nashik देशभरात पुन्हा एकदा कोरोना रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. दिल्लीसह महाराष्ट्र,कर्नाटक,केरळ,तामिळनाडू व तेलंगणा या राज्यांमध्ये कोरोनाचे नवे रुग्ण समोर येत आहेत.राज्यात सध्या २७८ सक्रिय रुग्ण असून,नाशिक महापालिका अलर्ट मोडवर आली आहे.
नाशिक महापालिकेने संभाव्य वाढीचा सामना करण्यासाठी ५ हजार अँटीजन किट्सची खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.या किट्ससाठी महापालिकेने निविदा प्रक्रिया सुरू केली असून,थेट पुरवठादारांकडून खरेदी करण्यात येणार आहे.सध्या नाशिकमध्ये कोणताही सक्रिय रुग्ण आढळलेला नाही, तरीही प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी मनपा सज्ज झाली आहे.
🔍 देशातील आणि राज्यातील कोरोना स्थिती: Coronavirus Update Nashik
देशभरात सध्या १००९ सक्रिय रुग्ण
राज्यात २७८ सक्रिय रुग्ण असून,
मुंबई – ३७
ठाणे – १९
नवी मुंबई – ७
पुणे – २
पिंपरी चिंचवड, लातूर, रायगड, कोल्हापूर – प्रत्येकी १
मागील काही दिवसांत ४ मृत्यूंची नोंद झाली आहे, आणि हे सर्व रुग्ण गंभीर सहव्याधींनी बाधित होते.
🦠 कोरोनाचा नवा प्रकार सौम्य, पण सतर्कता आवश्यक
सद्याचा विषाणू हा JN.1 चा उपप्रकार आहे. तो गंभीर नसल्यानं बहुतेक रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्याची गरज भासत नाही. आजार लक्षणे म्हणजे सर्दी, खोकला आणि सौम्य ताप यासारखी असून रुग्णांची स्थिती स्थिर आहे, असे आरोग्य तज्ञ सांगत आहेत.
🛡️ नाशिक मनपाची तयारी:
सुरुवातीस ५ हजार किट्स, गरजेनुसार आणखी खरेदी
शासनाकडे मागणी, पण साठा नसल्यामुळे स्वतंत्र खरेदी
मनपा आरोग्य विभाग सतर्क आणि सक्रिय मोडवर
लक्षणे आढळल्यास त्वरित तपासणी करावी
गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरावा
सर्दी, खोकला, ताप असल्यास इतरांपासून अंतर ठेवावे
🗣️ जागृती हाच बचावाचा उपाय आहे! प्रशासन सज्ज आहे, नागरिकांनीही सहकार्य करावे.