🖊️ जनस्थान ऑनलाईन | नाशिक –CREDAI Nashik Labour Week – बांधकाम क्षेत्राच्या विकासामध्ये मोलाचा वाटा उचलणाऱ्या कामगारांचे योगदान लक्षात घेऊन क्रेडाई नाशिक मेट्रो तर्फे १ मे ते ७ मे २०२५ या कालावधीत कामगार कृतज्ञता सप्ताह साजरा करण्यात आला. क्रेडाईचे अध्यक्ष गौरव ठक्कर यांनी ही माहिती दिली.
या सप्ताहात नाशिकमधील विविध बिल्डर्सच्या प्रकल्पांवर काम करणाऱ्या कामगारांसाठी आरोग्य, सुरक्षा, कल्याण योजना व प्रेरणा सत्रांचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी क्रेडाई राष्ट्रीय सल्लागार जितूभाई ठक्कर, माजी अध्यक्ष उमेश वानखेडे, कृणाल पाटील, रवी महाजन, तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
📅 सप्ताहाचे ठळक कार्यक्रम:
🔹 दिनांक 🔹 प्रकल्प 🔹 उपक्रम
01-05-2025 आनंदवन (रवी महाजन डेव्हलपर्स) कामगार नोंदणी व ज्ञान सत्र
02-05-2025 गोदा स्पंदन (पाटील शाह हाऊसिंग) सुरक्षा जागरूकता
03-05-2025 ट्रीलँड (ABH डेव्हलपर्स) कामगार कल्याण योजना माहिती
04-05-2025 साईराज प्लाझा (हर्षल हणमंते) कल्याण योजना सत्र
05-05-2025 मुक्तांगण (वैष्णव कन्स्ट्रक्शन्स) आरोग्य सत्र – विकास माळी यांचे मार्गदर्शन
06-05-2025 मेट्रो झोन (संकलेचा कन्स्ट्रक्शन्स) प्रेरणा सत्र – डॉ. रोहन बोरसे
07-05-2025 एलिव्हेट (श्रीजी ग्रुप) आरोग्य तपासणी – डॉ. प्रतीक बांगरे, प्रमाणपत्र वितरण
🩸 आरोग्य सेवा व सामाजिक उपक्रम:(CREDAI Nashik Labour Week)
१०००हून अधिक कामगारांची बीओसीडब्ल्यू नोंदणी
१००+ कामगारांचे रक्तदान (जनकल्याण व समता रक्तपेढी सहयोग)
नेत्र तपासणी व औषध वाटप
कौशल्य प्रमाणपत्र वितरण
🙌 उपक्रमाच्या यशात सहकार्य करणारे मान्यवर आणि पदाधिकारी:
संदीप कुयटे (रामकृष्ण आरोग्य संस्था), अंजली बोराडे (दिशा फाउंडेशन), नंद (मातोश्री कॉलेज)
तुषार संकलेचा (मानद सचिव), विजय चव्हाणके (समन्वयक)
क्रेडाई टीम: अनिल आहेर, मनोज खिवंसरा, अंजन भालोदिया, उदय घुगे, श्रेणिक सुराणा, सचिन बागड, ऋषिकेश कोते, हंसराज देशमुख, श्यामकुमार साबळे, अनंत ठाकरे, सागर शाह, निशित अटल, सुशील बागड, निरंजन शाह, वृषाली हिरे, दीपाली बिरारी, सतीश मोरे, सुशांत गांगुर्डे, अभिषेक महाजन, समीर सोनवणे, मनोज लाडानी, हर्षल हणमंते, भूषण कोठावदे, शिवम पटेल, हिरेन भडजा, मयुरेश चौधरी, ऋषभ तोडरवाल, आदित्य भातंबरेकर, अजिंक्य नाहार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
🌟 कामगारांचे सशक्तीकरण, क्रेडाई नाशिक मेट्रोचा संकल्प!
या उपक्रमाच्या माध्यमातून क्रेडाई नाशिक मेट्रोने कामगारांच्या आरोग्य, कल्याण आणि सन्मानाची जाणीव व्यक्त करत एक प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
[…] व्यावसायिकांची अग्रगण्य संस्था क्रेडाई नाशिक मेट्रोचा ३८ वा स्थापना दिवस मोठ्या उत्साहात […]