ST प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी! २०२५ पासून एसटीच्या नवीन बसेस हायब्रीड इंधनावर चालणार
इंधन बचत आणि प्रदूषणावर नियंत्रण :इंधन खर्चात दरवर्षी २३५ कोटींची बचत
किरण घायदार | जनस्थान ऑनलाईन | नाशिक |– MSRTC Hybrid Buses 2025 एसटी महामंडळाच्या प्रवाशांसाठी आणि पर्यावरण प्रेमींना दिलासादायक बातमी आहे. २०२५-२६ पासून एसटीच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाऱ्या २० हजार बस हायब्रीड इंधनावर चालणार असून त्यामध्ये सी.एन.जी. आणि एल.एन.जी. या पर्यावरण पूरक इंधनांचा वापर केला जाणार आहे.
परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी यासंदर्भात माहिती दिली. त्यांनी स्पष्ट केले की, इंधन पुरवठा दार संस्थांबरोबर झालेल्या बैठकीत हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
🔋 हायब्रीड तंत्रज्ञानाचा अवलंब – आर्थिकदृष्ट्या फायदेशीर (MSRTC Hybrid Buses 2025)
सध्या एसटी महामंडळ दरवर्षी सुमारे ३४ हजार कोटी रुपये फक्त डिझेलवर खर्च करते, आणि रोज १०.७ लाख लिटर डिझेल वापरले जाते. हायब्रीड बससाठी वापरण्यात येणारे सीएनजी आणि एलएनजी हे इंधन डिझेलपेक्षा स्वस्त व प्रदूषणमुक्त आहे.
सीएनजी/एलएनजीवर बसची कार्यक्षमता: ५ ते ५.५ किमी प्रति लिटर
डिझेलवर कार्यक्षमता: फक्त ४ किमी प्रति लिटर
💰 इंधन खर्चात दरवर्षी २३५ कोटींची बचत
एलएनजी इंधनाच्या खरेदीसाठी किंग्ज गॅस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी केलेल्या करारानुसार, हे इंधन डिझेलच्या दरापेक्षा २०% स्वस्त दराने एसटीला मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर इंधन खर्चात बचत होणार आहे.
🛣️ राज्यभरात पायाभूत सुविधा विकसित
९० ठिकाणी एलएनजी पंप उभारले जाणार
२० सीएनजी पंप महानगर गॅस प्रायव्हेट लिमिटेड मार्फत उभारले जात आहेत
बस उत्पादक कंपन्यांकडून हायब्रीड तंत्रज्ञानावर चालणाऱ्या नव्या बससाठी प्रस्ताव मागवले
🌿 हायब्रीड बस म्हणजे – स्वस्त, कार्यक्षम, पर्यावरणस्नेही!
हा निर्णय केवळ खर्च बचत करणारा नाही तर भविष्यातील सतत वाढणाऱ्या डिझेल दरांपासून संरक्षण, पर्यावरण रक्षण आणि प्रवाशांसाठी सोयीचे वाहतूक माध्यम म्हणून क्रांतिकारक ठरणार आहे.
[…] घोषणा केली. आता जून २०२५ पासून कर्मचाऱ्यांना मूळ वेतनावर ५३% महागाई भत्ता मिळणार […]
[…] राज्यातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. येत्या शैक्षणिक […]
[…] लाभ सहज आणि स्वस्तात घेता यावा, यासाठी राज्य परिवहन विभागाने आजवरची सर्वात प्रभावी […]