क्राऊन स्टार,७३ पैलूंचा हिरा ही ‘ओरा’ ची खासियत : सई ताम्हणकर

नाशिक मधील पहिल्या ओरा ज्वेलरी स्टोअरचे अभिनेत्री सई ताम्हणकर यांच्या हस्ते उदघाटन : हिऱ्यांच्या दागिन्यांवर २५ टक्क्यांपर्यंत सूट

0

नाशिक,दि. २६ मे २०२३ –‘अनेक वेगवेगळे दागिने परिधान करण्यापेक्षा एकच घसघशीत दागिना अंगावर असणे मी महत्त्वाचे मानते; म्हणूनच आज ‘ओरा’ची खासियत असलेला क्राऊन स्टार परिधान केलेला आहे !’अशा शब्दात नाशिक मधील पहिल्या व भारतातील ७५ व्या ओरा ज्वेलरी स्टोअरच्या उद्घाटनप्रसंगी सुप्रसिद्ध मराठी सिनेतारका सई ताम्हणकर यांनी या ब्रँडची प्रशंसा केली.

नाशिकच्या कॅनडा कॉर्नर परिसरातील या स्टोअरच्या शानदार उद्घाटन समारंभासाठी ‘ओरा’फाईन ज्वेलरीचे प्रमुख कार्यकारी अधिकारी सेसिल डी सांता मारिया, व्यवस्थापकीय संचालक दिपू मेहता, तसेच नाशिक स्टोअरचे प्रमुख सागर ठक्कर आदींसह अधिकारी व ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Actress Sai Tamhankar inaugurated the first Orra jewelery store in Nashik

प्रारंभी व्हीन्टेज कार मधून ढोल ताशांच्या आवाजात वाजत गाजत सई ताम्हणकरचे आगमन झाले. फित कापून व दीप प्रज्वलनाने स्टोअरचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ‘नाशिक हे उत्तम सांस्कृतिक शहर असून येथील हवामान देखील खूप चांगले आहे. तसेच येथील खाद्य संस्कृती व वायनरी देखील मला आवडते!’अशा शब्दात सईने नाशिकचा महिमा वर्णन केला. सई ताम्हणकर यांच्या उपस्थितीत विविध मॉडेल ने रॅम्पवर आपला जलवा दाखवीत औराच्या विविध कलेक्शनचे प्रदर्शन केले.

Actress Sai Tamhankar inaugurated the first Orra jewelery store in Nashik

या स्टोअर संदर्भात व्यवस्थापकीय संचालक दिपू मेहता यांनी सांगितले की,औराचे कलाकुसर केलेले उत्कृष्ट हिऱ्यांचे दागिने स्टोअरमध्ये उपलब्ध असून त्यास ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळेल अशी अपेक्षा आहे. तर स्टोअरचे प्रमुख सागर ठक्कर यांनी सांगितले की,’ या नवीन शोरूममध्ये डायमंड ज्वेलरीची मोठी श्रेणी उपलब्ध असून ओरा क्राउन स्टार कलेक्शन, एक्स्ट्रा कलेक्शन आणि प्लॅटिनम कलेक्शन यांचा समावेश असल्याची माहिती ठक्कर यांनी दिली.

मर्यादित कालावधीसाठी हिऱ्यांच्या दागिन्यांवर २५ टक्क्यांपर्यंत तसेच २२ कॅरेट सोन्याचे दागिने बनवण्यावर २२ टक्के सूट देण्यात येणार आहे. तसेच मासिक हप्त्यांवर दागिने खरेदी केल्यास शून्य टक्के व्याजदर आकारला जाईल अशी माहिती यावेळी देण्यात आली.ओराचे पेटंट घेतलेला ७३ पैलूंचा हिरा क्राउन स्टार भारतातील सर्वात तेजस्वी हिरा देखील या शोरूममध्ये उपलब्ध असल्याचे माहिती यावेळी देण्यात आली. उपस्थित सई ताम्हणकर यांनां काही प्रश्न विचारण्याची संधी यावेळी देण्यात आली तसेच ग्रुप करून आपल्या आवडत्या अभिनेत्रीबरोबर फोटो काढण्याचा आनंद देखील चाहत्यांनी लुटला.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!