चक्रीवादळ रेमाल LIVE:चक्रीवादळ रेमाल येत्या ६ तासात उग्र बनणार,बंगालसह अनेक राज्यांना धोका
कोलकाता विमानतळ २१ तासासाठी बंद
नवीदिल्ली,२६ मे २०२४ – हवामान खात्याने म्हटले आहे की बंगालच्या उपसागरावरील खोल दाब रविवारी संध्याकाळपर्यंत चक्री वादळात बदलू शकते आणि २६ मेच्या रात्री पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या किनारपट्टीवर धडकू शकते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ ताशी ११०-१२० किलोमीटर वेगाने जमिनीवर धडकू शकते.ते ताशी १३५ किलोमीटरचा वेग गाठू शकते. हवामान विभागाने २६-२७ मे रोजी पश्चिम बंगाल आणि उत्तर ओडिशाच्या किनारी जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. २७-२८ मे रोजी ईशान्य भारताच्या काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्री वादळा मुळे हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम होणार असून खबरदारीचा उपाय म्हणून कोलकाता विमानतळ आज दुपारी १२ वाजे पासून उद्या सकाळी ९ वाजे पर्यंत २१ तासासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे .
वादळाच्या आगमनाच्या वेळी, समुद्रात १.५ ते २ मीटर उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे, ज्यामुळे किनारपट्टीवरील पश्चिम बंगाल आणि बांगलादेशातील सखल भाग पाण्याखाली जाऊ शकतात. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागात 27 मेच्या सकाळपर्यंत मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हवामान विभागाने २६ आणि २७ मे रोजी पश्चिम बंगालच्या किनारी जिल्ह्यांसाठी (दक्षिण आणि उत्तर २४ परगणा) रेड अलर्ट जारी केला आहे. येथे काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.
रेमाल चक्रीवादळ किनारपट्टीला धडकण्यापूर्वी एनडीआरएफने आपली तयारी पूर्ण केली आहे.एजन्सीशी बोलताना बंगालच्या २४ परगणा जिल्ह्यातील एनडीआरएफ अधिकाऱ्याने सांगितले की, जर येथे चक्रीवादळ आले तर आमचे सैनिक कोणत्याही आपत्तीसाठी तयार आहेत.
‘रेमाल’ चक्रीवादळ आज रात्री भारतीय किनारपट्टीवर धडकू शकते. त्याचा प्रभाव मंगळवार २८ मे पर्यंत राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. किनारपट्टी भागात मुसळधार तर इतर ठिकाणी हलका पाऊस पडेल. वाऱ्याचा वेग जास्त असेल, त्यामुळे किनारी भागात राहणाऱ्या सर्व लोकांनी घरातच राहावे.असं आवाहन प्रशासना तर्फे करण्यात आले आहे.
https://x.com/AHindinews/status/1794599224648019997