नाशिकमध्ये आयकर विभागाची मोठी कारवाई :सराफाकडे मिळाली २६ कोटीची रोकड 

५०० च्या नोटांचा खच,९० कोटीची बेसहिशोबी मालमता,नाशकात ३० तासांच्या आयटी रेडमुळे खळबळ!

0

नाशिक,दि,२६ मे २०२४ –नाशिक मधून मोठी बातमी हाती येत आहे, नांदेड नंतर आता नाशिक मध्ये आयकर विभागाने मोठी कारवाई केली आहे. एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करून प्राप्तिकर विभागाने (IT Raid) तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. नाशिक शहरात एका सराफा व्यापाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

तब्बल ३० तास चाललेल्या या कारवाईत २६ कोटींची रोकड जप्त केली आहे. जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल १४ तास लागले आहेत. जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी प्राप्तिकर विभागाला एकूण ७ कार बोलवाव्या लागल्या.आज पर्यंत आयकर विभागाची कारवाई पहाटे करण्यात येत होती परंतु हि कारवाई सायंकाळच्या सुमारास करण्यात आली ही कारवाई करताना नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते.

५० ते ५५ अधिकाऱ्यांनी सुराणा ज्वेलर्स यांची पेढी तसेच त्यांच्या रिअल इस्टेट व्यवसायाच्या कार्यालयात छापासत्र सुरू केले होते.त्याचवेळी त्यांच्या राका कॉलनी येथील आलिशान बंगल्यातदेखील स्वतंत्र पथकाने तपासणी सुरू केली होती. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी असलेले त्यांचे कार्यालय, खासगी लॉकर्स व बँकांमधील लॉकर्सही तपासण्यात आले. मनमाड व नांदगाव येथील त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या घरीही तपासणी करण्यात आली.घरच्या फर्निचर मध्ये आणि भिंती मध्ये हि रक्कम लपवण्यात आली होती

आयकर विभागाच्या या कारवाईमुळे सध्या नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.या कारवाईमुळे व्यापाऱ्यांत सध्या तणावाचे वातावरण आहे.आगामी काळात प्राप्तिकर विभाग कारवाईचा बडगा कोणावर उचलणार,असा प्रश्न दबक्या आवाजात विचारला जात आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.