आजचे राशिभविष्य रविवार,२६ जुलै २०२६

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

0

ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक (Daily Horoscope in Marathi)
आषाढ शुक्ल द्वादशी. ग्रीष्म ऋतू.पराभव नाम संवत्सर. शके १९४८, संवत २०८२.
राहुकाळ – सायंकाळी ४.३० ते ६.००
आज चांगला दिवस आहे. आज प्रदोष व वामन पूजन आहे.
नक्षत्र – ज्येष्ठ / सकाळी ७.३५ नंतर मूळ.  
आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक / सकाळी ७.३५ नंतर धनु.
रवी षडाष्टक चंद्र.  
चंद्र केंद्र नेपच्यून.  
राशिभविष्य(Daily Horoscope in Marathi)

मेष:- (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)भाग्याची साथ लाभेल. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. प्रवासाचे योग संभवतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाची कामे यशस्वीपणे पूर्ण होतील.

वृषभ:- (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)आर्थिक व्यवहारात लाभ होईल. कुटुंबातील वातावरण आनंददायी राहील. नियोजनबद्ध कामातून यश मिळेल. संयमाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.

मिथुन:- (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)नवीन कल्पनांना योग्य दिशा मिळेल. विद्यार्थ्यांना आणि बौद्धिक क्षेत्रातील व्यक्तींना यश मिळेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. संवादातून लाभ होईल.

कर्क:- (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)कार्यक्षेत्रात प्रगती होईल. मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभदायक ठरेल. आरोग्याची काळजी घ्या.

सिंह:– (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)संततीकडून आनंददायक बातमी मिळेल. सर्जनशील कार्यात यश मिळेल. प्रेमसंबंध अधिक दृढ होतील. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल.

कन्या:- (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)घरगुती वातावरण सुखद राहील. मालमत्तेसंबंधी विषयात प्रगती होईल. मानसिक समाधान मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल.

तुळ:- (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)पराक्रम वाढेल. भावंडांचे सहकार्य लाभेल. लहान प्रवास लाभदायक ठरेल. महत्त्वाच्या चर्चेत यश मिळेल.

वृश्चिक:- (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)सकाळी ७.३५ पर्यंत राशीस्थानी चंद्र असल्याने आत्मविश्वास वाढेल. महत्त्वाची कामे लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. रवी-चंद्र षडाष्टकामुळे भावनिक निर्णय टाळा. संयम लाभदायक ठरेल.

धनु:- (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)सकाळी ७.३५ नंतर चंद्र राशीत प्रवेश करणार असल्याने उत्साह आणि आत्मविश्वास वाढेल. धार्मिक कार्यात मन रमणार आहे. नवीन योजनांची सुरुवात करण्यासाठी दिवस अनुकूल आहे.

मकर:- (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)खर्चावर नियंत्रण ठेवा. आध्यात्मिक कार्यात मन रमणार आहे. दूरच्या व्यक्तींकडून शुभवार्ता मिळू शकते. संयम लाभदायक ठरेल.

कुंभ:- (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)मित्रांचे सहकार्य लाभेल. आर्थिक प्रगतीची संधी मिळेल. सामाजिक क्षेत्रात मान-सन्मान वाढेल. नवीन योजना यशस्वी ठरतील.

मीन:- (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)व्यवसाय आणि नोकरीत प्रगतीची संधी मिळेल. चंद्र-नेपच्यून केंद्र योगामुळे कल्पकता वाढेल. वरिष्ठांची कृपा लाभेल. कुटुंबासोबत आनंदाचे क्षण घालवाल.

(कुंडलीवरून करियर,लग्न, व्यवसाय आणि इतर मार्गदर्शन,’राशीभाव’ या कार्यक्रमाचे बुकिंग आणि तुमच्या राशीच्या स्वभावाबद्दल जाणून घ्या.“राशीभाव” या फेसबुक पेजला भेट द्या. ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी – 8087520521) 

Mangesh Panchakshari
ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक

 

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!