दिल्ली ब्लास्ट प्रकरणात मोठा खुलासा! ‘व्हाईट-कॉलर’ डॉक्टरांच्या आतंकी मॉड्यूलचा पर्दाफाश
फिदायीन हल्ल्यासाठी शोध सुरूच?

नवी दिल्ली, दि. १६ नोव्हेंबर २०२५ – Delhi Blast 2025 लाल किल्ल्यासमोरील कार-स्फोटानंतर संपूर्ण देशाला हादरवून सोडणाऱ्या या प्रकरणाची चौकशी आता एका अतिशय धक्कादायक वळणावर पोहोचली आहे. दहशतवाद्यांच्या या नेटवर्कमध्ये डॉक्टर, विद्यार्थी आणि कथित ‘व्हाईट-कॉलर’ व्यक्तींनी सक्रिय भूमिका बजावल्याचे उघड झाल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. एनआयए, आयबी, जम्मू-काश्मीर पोलिस आणि यूपी ATS यांच्या संयुक्त कारवाईत या मॉड्यूलचा मोठा भाग उघड झाला असून अनेक महत्वाचे धागेदोरे समोर आले आहेत.
यूपी ATS चे ताबडतोड सर्च ऑपरेशन(Delhi Blast 2025)
रविवारी सकाळपासूनच लखनऊच्या पारा परिसरासह राज्यातील सहा ठिकाणी यूपी ATS ने एकामागोमाग एक छापे टाकले. हे सर्व ठिकाण डॉ. शाहीन आणि डॉ. परवेज यांच्या संपर्कात असलेल्या लोकांशी संबंधित असल्याचे समोर आले.एटीएसकडे मिळालेल्या माहितीनुसार १३ संशयितांची चौकशी सुरू असून त्यांचा दहशतवादी मॉड्यूलशी थेट किंवा अप्रत्यक्ष संबंध तपासला जात आहे.सदर व्यक्ती गेल्या सहा महिन्यांत डॉक्टर शाहीन आणि डॉक्टर परवेज यांच्या ताबडतोब संपर्कात होते. त्यांच्या फोन कॉल्स, मीटिंग्ज, आर्थिक व्यवहार आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत. मात्र, अद्याप कोणाला औपचारिक ताब्यात घेण्यात आलेले नाही.
पुलवामाचा डॉ. उमर नबी — संपूर्ण मॉड्यूलचा मास्टरमाइंड
जम्मू–काश्मीर पोलिसांनी चौकशीत उघड केले की हे मॉड्यूल डॉ. उमर नबी नावाच्या कट्टरपंथी युवकाच्या नियंत्रणाखाली होते.उमर नबीने: गेल्या एक वर्षात फिदायीन हल्लेखोर शोधण्याचा प्रयत्न केला,मोठ्या प्रमाणात युवकांचे ब्रेनवॉशिंग केले, कश्मीर, हरियाणा आणि यूपीमध्ये नेटवर्क पसरवले. त्याची योजना ६ डिसेंबर रोजी दिल्लीतील कोणत्याही गर्दीच्या भागात VBIED म्हणजेच वाहन-आधारित आयईडीद्वारे मोठा स्फोट घडवून आणण्याची होती.१० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार-स्फोटात उमरच ठार झाल्याचे पुढे स्पष्ट झाले.
कुलगाममधील ‘गुप्त भेट’ आणि विद्यार्थी जासिरची कबुली
अटक करण्यात आलेल्या राजनीतिशास्त्राच्या विद्यार्थी जासिर उर्फ दानिशने चौकशीत मोठे धक्कादायक तपशील दिले.त्याने कबूल केले की:तो मागील वर्षी कुलगाममधील एका मशिदीत या डॉक्टरांच्या गटाला भेटला.त्याला फरीदाबादच्या अल-फलाह युनिव्हर्सिटीत राहण्याची सोय करून देण्यात आली.सुरुवातीला त्याला ओव्हरग्राउंड वर्कर म्हणून वापरण्याचा विचार होता.मात्र, उमर नबीने त्याला थेट फिदायीन (आत्मघाती हल्लेखोर) बनवण्याचा प्रयत्न केला.एप्रिल महिन्यात आर्थिक अडचणींमुळे मॉड्यूलमधील एक सदस्य गटातून बाहेर पडला आणि हे ‘मिशन’ काही काळासाठी थांबले. यामुळे उमरची योजना काही काळासाठी विस्कळीत झाली.
तुर्किये दौऱ्यातून उद्भवलेली ‘आंतरराष्ट्रीय लिंक’
उमर नबी आणि डॉक्टर मुजम्मिल गनाई हे दोघेही २०२१ मध्ये तुर्किये येथे गेले होते.तेथे त्यांनी जैश-ए-मोहम्मदच्या ओजीडब्ल्यू (Over Ground Worker) शी गुप्तपणे भेट घेतली होती.त्याच्याच मार्गदर्शनाखाली:३६० किलो अमोनियम नायट्रेट,पोटॅशियम नायट्रेट,सल्फर असा मोठ्या प्रमाणात स्फोटक साहित्य जमा करण्यात आले. ही सामग्री फरीदाबादमधील युनिव्हर्सिटी कॅम्पसमध्ये संचयित असल्याचेही तपासणीत दिसून आले.मात्र, श्रीनगर पोलिसांनी केलेल्या कारवाईत डॉक्टर मुजफ्फर गनाईला पकडण्यात आले आणि सर्व स्फोटक साहित्य जप्त झाले. त्यामुळे ६ डिसेंबरची मोठी साजिश उधळली गेली.
लाल किल्ला स्फोट — ‘बॅकअप प्लॅन’ ?
मुख्य योजना उधळल्याने उमर नबीने तात्काळ ‘बॅकअप प्लॅन’ अंमलात आणला.आणि १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेला स्फोट हा त्याच ‘घाईत तयार केलेल्या प्लॅन’चा भाग असल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.या स्फोटात १३ जणांचा मृत्यू झाला आणि दिल्ली पोलिसांना हाय-प्रोफाईल स्फोटाची चौकशी करावी लागली.जैशच्या पोस्टरपासून उलगडला मोठा ‘आंतरराज्यीय नेटवर्क’या संपूर्ण घडामोडींची सुरुवात झाली ती १९ ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या बाहेरील भागात आढळलेल्या जैश-ए-मोहम्मदच्या पोस्टरमुळे.सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तीन युवकांना अटक झाली—आरिफ निसार उर्फ साहिल,यासिर-उल-अशरफ,मकसूद अहमद डार उर्फ शादिद.त्यांच्या चौकशीत मौलवी इरफान अहमदचे नाव समोर आले—एकेकाळी पॅरामेडिक असलेला आणि सध्या इमाम म्हणून काम करणारा. त्यानेच डॉक्टरांना कट्टरपंथाकडे वळवले, असे ATS स्रोत सांगतात.
तपास अजूनही सुरू – अजून किती जण जाळ्यात?
ATS, NIA, IB आणि दिल्ली पोलिसांचे संयुक्त सर्च ऑपरेशन अद्याप चालू आहे.साईबर पुरावे, आर्थिक व्यवहार, ईमेल्स, विदेशी संपर्क, तुर्किये कनेक्शन, कश्मीर–हरियाणा–यूपीतील गुप्त ठिकाणांची माहिती तपासली जात आहे.एक गोष्ट मात्र स्पष्ट होत आहे दहशतवाद आता ‘व्हाईट कॉलर’ रूपातही समोर येत आहे, जिथे अत्यंत सुशिक्षित, तांत्रिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती दहशतवादी मॉड्यूलचा भाग बनत आहेत.



