नाशिक जिल्ह्यातील काही भागात जाणवले भूकंपाचे धक्के 

0

नाशिक – नाशिक जिल्ह्यात काही दिवसापासून  पावसाचे थैमान सुरु होते दोन दिवसा पासून पावसाने काही प्रमाणात विश्रांती घेतली असली ‘तेरी  नाशिक जिल्हा पुन्हा एकदा हादरला आहे. नाशिक शहरापासून चाळीस किलोमीटर अंतरावर असलेल्या जिल्ह्यातील पेठ तालुक्यात असलेल्या खरपडी, नाचलोंडी, धानपाडा, तसेच त्रंबकेश्वर तालुक्यातील ठाणपाडा, खैरपल्ली या गावात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

या भूकंपाच्या धक्यामुळे स्थानिक नागरिक भयभीत झाले असून परिसरात उलटसुलट चर्चाना उधाण आले आहे. जिल्ह्यात झालेल्या पावसाने या तालुक्याना फटका बसला. अनेक भागात दरडी कोसळल्या होत्या , रस्ते खचले, अनेक पूल पाण्यात जाऊन संपर्कही तुटला होता. शिवाय येथे शेती पिकाचेही नुकसान झाले. येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरले होते. त्यामुळे हे तालुके अतिवृष्टीतून सावरत असताना आता या गावांना भूकंपाचे हादरे बसले आहेत. पेठ त्रंबक तालुक्यातील भूकंपाचा प्राथमिक अहवाल आला आहे.

नाशिकच्या वेध शाळेपासून चाळीस किलोमीटर अंतरावर ड्युरा. ६४, मिग्रॅ. – २.४ ड्युरा. – १४५ से, मिग्रॅ. – ३.० अशा प्रमाणात भूकंपाचे हादरे जाणवले आहेत याबाबत मेरी येथील भूकंपमापक यंत्रावर नोंद करण्यात आलेली आहे याबाबत नाशिकचे निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे यांनी अधिकृत माहिती दिली आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.