नाशिक (प्रतिनिधी) : नागरी सहकारी बँकांनी ‘सायबर सिक्युरीटी’साठी जास्तीत-जास्त सतर्क राहून आर्थिक सुरक्षा राखावी. तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक बदल त्याविषयीची सखोल माहिती घेऊन, प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षित करावे तो जोखिम व्यवस्थापनाचा भाग आहे व ती काळाजी गरज आहे, त्यासाठी खातेदार, ग्राहकांमध्ये जनजागृती करावी, जागरूकता आणावी, असे प्रतिपादन नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास जयदेव ठाकूर यांनी केले.
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनतर्फे ‘सायबर सिक्युरीटी’ या विषयावरील एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन विश्वास क्लब हाऊन येथे करण्यात आले आहे. शुभारंभ प्रसंगी मार्गदर्शन करताना श्री. विश्वास ठाकूर बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सायबर अटॅक हा अनपेक्षित होतो त्यावर उपाययोजना म्हणजे सावधगिरी आहे त्याबाबत मार्गदर्शन या कार्यशाळेतून देण्यात येत आहे.
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशन च्या संचालिका डॉ. शशिताई अहिरे म्हणाल्या की, आज बँकिंग क्षेत्रात वेगाने बदल होत आहेत व त्यातून नवनवीन आव्हाने समोर येत आहे. त्यात ‘सायबर सिक्युरीटी’ हे त्यासाठी बँकांनी जाणीवपूर्वक सावधगिरी बाळगावी.कार्यशाळेमध्ये नाशिक जिल्ह्यातील नागरी सहकारी बँकांतील आयटी विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे कार्याध्यक्ष राजेंद्र सूर्यवंशी म्हणाले की, बँकिंग क्षेत्रात व्यवस्थापनाबरोबरच तांत्रिक, तंत्रज्ञानाचे ऑडीट करणे, बँकांच्या सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा भाग आहे त्याबाबत सजग रहावे.नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे संचालक अजय ब्रम्हेचा म्हणाले की, माहिती व तंत्रज्ञान क्षेत्र वेगाने विकसित होत असताना त्याची उपयुक्तता, धोके याविषयी मूलभूत माहिती असणे बँकेत काम करणार्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. त्यासाठी ही कार्यशाळा दिशादर्शक ठरेल
कार्यशाळेत सायबर तज्ज्ञ विकास नाईक यांनी हॉनरींग दि रेग्युलेटर्स व्हीजन अॅण्ड गाईडलाईन्स, पॉलिसी अॅण्ड प्रोसिड्युर्स रिक्वायर्ड बाय को-ऑप. बँक्स् कॉप्लिमेंटींग आरबीआय-सीएसएफ अॅण्ड इटस् 4 लेव्हल्स, इक्विपिंग युवरसेल्फ स्टाफ विथ सायबर अवेअरनेस व स्टॅण्डर्डस् रिनोव्हड प्रॅक्टीसेस् टू प्रोटेक्ट युवर आयटी अॅसेटस् या विषयांवर मार्गदर्शन केले.
सायबर लॉ तज्ज्ञ राधिका देशपांडे यांनी लॉ प्रोव्हीजन्स अॅण्ड कम्प्लायन्स अॅण्ड इटस् डिलेटेड अंडरस्टॅडींग : आयटी अॅक्ट इटस् रोल इन बँकिंग रिस्क टू अलाईन अॅडमिन – एच.आर. मॅनेजमेंट, एसएलएआर व्ह्युज् या विषयांवर मार्गदर्शन केले. ऑडीट आणि सायबर हायजिन तज्ज्ञ स्वाती गोरवाडकर यांनी ऑडीट अॅण्ड कम्प्लायन्स या विषयावर मार्गदर्शन केले.सायबर तज्ज्ञ अजय भयानी यांनी डिमॉस्ट्रेशन ऑप टूल्स फॉर डिफेन्स टूल-बेस्ड सोल्युशन्स फॉर मॉनिटरींग मल्टीट्युडस् ऑफ आयटी सर्व्हीसेस् या विषयावर मार्गदर्शन केले.
नेटवर्क सुरक्षा तज्ज्ञ साईप्रसाद कुलकर्णी यांनी हॅण्डलींग एक्सपेक्टेड अॅण्ड अनएक्सपेक्टेड इन्सिडेन्ट रिस्पॉन्स या विषयावर मार्गदर्शन केले.कार्यक्रमाचा समारोप नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे संचालक धनंजय कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थित प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्राचे वाटप केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचलन मनिषा पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन नाशिक जिल्हा नागरी सहकारी बँक्स् असोसिएशनचे व्यवस्थापक रामलाल सानप यांनी मांडले.