अजित पवारांना पहिला धक्का : राष्ट्रवादीच्या या नेत्याने सोडली साथ

0

मुंबई,दि ३ जुलै २०२३ – २०१९ साली पहाटेच्या शपथविधी नंतर महाराष्ट्राच्या राजकारणात  मोठी खळबळ उडाली होती. त्याची पुनरावृत्ती काल बघायला मिळाली. शिवसेने नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडलीअजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या ९ आमदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली असून अजित पवारांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आलं आहे. यावेळी शपथविधीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार, खासदार उपस्थित होते.या सर्वांचा आपल्याला पाठिंबा असल्याचा दावाही अजित पवारांनी शपथविधीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत केला होता. मात्र, आता अजित पवारांना पहिला धक्का बसला आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवारांसोबत असल्याचं जाहीर केलं आहे.

अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की, ” शपथविधीची आपल्याला काहीच कल्पना नव्हती. मी वेगळ्या चर्चेसाठी अजित पवारांकडे गेलो होतो. त्यावेळी अचानक शपथविधी झाला.रविवारी दुपारी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्याला खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुनिल तटकरे राजभवनात उपस्थित होते. त्यामुळे अमोल कोल्हे अजित पवारांच्या पाठिशी असल्याचं म्हटलं जात होतं. तर शरद पवार यांना हा मोठा धक्का समजला जात होता. मात्र आज अमोल कोल्हे यांनी मी शरद पवार साहेबांसोबत असल्याचं ट्वीट केलं आहे.

अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे की,” शपथविधीची आपल्याला काहीच कल्पना नव्हती. मी वेगळ्या चर्चेसाठी अजित पवारांकडे गेलो होतो. त्यावेळी अचानक शपथविधी झाला. पण माझी भावना आहे की मी शरद पवार साहेबांसोबतच आहे. मी जाहीरपणे सांगतोय, साहेबांना भेटूनही सांगेन की मी त्यांच्यासोबतच आहे.

खासदारअमोल कोल्हे यांनी ट्वीट करुन आपली भूमिका जाहीर केली आहे. “जब दिल और दिमाग में जंग हो तो दिल की सुनो। शायद दिमाग कभी कभी नैतिकता भूल जाता है … पर दिल कभी नहीं।#मी_साहेबांसोबत” असं अमोल कोल्हे यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.