मुंबई दि. ९ मे २०२३ –उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते आणि मुंबईचे माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचे ह्दयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले आहे. विश्वनाथ महाडेश्वर यांनी वयाच्या ६३ व्या वर्षी अखेरचा श्र्वास घेतला.
काल रात्री त्यांना ज्यावेळी त्रास जाणवू लागल्याने त्यांना तात्काळ व्हि एन देसाई या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. परंतु उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती त्यांच्या जवळच्या सहकार्यांनी दिली आहे. ह्दयविकाराच्या झटक्याने विश्वनाथ महाडेश्वर यांचं निधन झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं.
त्यांचे पार्थिव अंतिम दर्शनासाठी सांताक्रूझ (पूर्व)पटेल नगर सर्विस रोड येथील राजे संभाजी विद्यालयात दुपारी २ वाजता ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे, त्यानंतर दुपारी ४ वाजता अंत्ययात्रा टीचर्स कॉलोनी येथील स्मशान भूमीच्या दिशेने निघेल. २०१७ ते २०१९ या काळात विश्वनाथ महाडेश्वर हे मुंबई महापालिकेचे महापौर होते.