उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन

0

लखनऊ – उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांचे निधन झाले आहे. ४ जुलै पासून त्यांच्यावर पीजीआय हॉस्पिटल मध्ये उपचार सुरु होते. २१ जूनला शूगर आणि ब्लड प्रेशरचा त्रास झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. त्यानंतर आजपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरु होते. १७ जुलैला अचानक त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. तेव्हा पासून ते सतत ऑक्सिजन सपोर्टवर आहेत. मात्र, आज उपचारादरम्यानच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

लखनऊ पीजीआयनं शनिवारी रात्री उशिरा याबाबत माहिती देताना सांगितलं, की उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि राजस्थानचे माजी राज्यपाल कल्याण सिंह यांचं दीर्घ आजारानं निधन झालं. गेल्या अनेक दिवसापासून ते आजारी होते.आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कल्याण सिंह हे उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री तसंच राजस्थान आणि हिमाचल प्रदेशचे माजी राज्यपालही होते. त्यांच्या निधनाची बातमी समोर येताच भाजपच्या मंत्री आणि खासदारांसह कार्यकर्त्यांनीही हळहळ व्यक्त केली.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.