Google Maps चं भन्नाट फिचर : प्रवासाआधी कळणार टोल ची रक्कम

0

नवी दिल्ली – मोबाईल मुळे जगात क्रांतीच झाली आहे.गुगल मॅपमुळे प्रवास सोपा झाला  आहे.अपरिचित रस्ता देखील गूगल मॅप मुळे समजायला लागला आहे.रस्त्यावर ट्राफिक किती आहे हे गूगल मॅप मुळे अचूक कळते.त्यामुळे ड्रायव्हिंग करताना लोक गुगल मॅपला प्राधान्य देतात. युजर्सच्या सोयीसाठी येत्या काही महिन्यांत गुगल मॅप्सचे नवे अपडेट येणार आहे. नव्या भन्नाट फिचरमुळे गुगल मॅप मार्गात येणाऱया टोल्सची किंमतही सांगेल. यामुळे प्रवास सुरू करण्याआधीच प्रवासादरम्यान किती टोल टॅक्स भरावा लागेल, याची माहिती मिळेल.

कंपनी सध्या या फीचरवर काम करत आहे.या फिचर मुळे यामुळे यूजर्सचा वेळ वाचेल, तसेच त्या टोलचे दर आधीच समजण्यास मदत होणार आहे. त्यामुळे आपण त्या टोल मार्गाने प्रवास करायचा की नाही हे देखील ठरवू शकणार आहात .

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.