नाशिक,दि, १० सप्टेंबर २०२४ –मोदक हा महाराष्ट्रात व दक्षिण भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे.महाराष्ट्र मध्ये विशेष पूजे प्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. उकडीच्या आणि तळणीच्या मोदकांखेरीज खवा, सुकामेवा, चॉकलेट, विविध रंगांचा वापर करून केलेल्या पारीचे मोदक असे साहित्य वापरून तयार केलेले मोदक विशेष लोकप्रिय आहेत. याचा पार्श्वभूमीवर दैनिक गांवकरी तर्फे आणि शिवाजीराव देशमुख सामाजिक आणि शैक्षणिक संस्था यांच्या विशेष सहकार्याने भव्य मोदक स्पर्धेचे आयोजन येत्या १६ सप्टेंबरला करण्यात आले आहे. विजेत्याला चांदीचा मोदक जिंकण्याची संधी मिळणार आहे.
नाशिकचे दैनिक गांवकरी कार्यालय ,रेडक्रॉस सिग्नल ,रविवार कारंजा येथे सोमवार दिनांक १६ सप्टेंबरला सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून जास्तीत जास्त संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हा असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
स्पर्धेचे नियम व पुढील प्रमाणे
१)स्पर्धेत निशुल्क प्रवेश असेल.
२)स्पर्धेला येताना सोबत तयार मोदकाची रेसिपी लिहून आणणे आवश्यक असेल.
३)स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महिलांनी घरूनच मोदक तयार करून आणावेत.
४)स्पर्धेतील प्रथम, द्वितीय, तृतीय विजेत्यांना चांदीचा मोदक जिंकण्याची संधी.
५)स्पर्धेत सहभागी महिलांसमवेत अन्य नातेवाईक तसेच मित्रपरिवारातील महिलांना उपस्थित राहण्याची परवानगी आहे.
६)स्पर्धेत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे.
नाव नोंदणी साठी संपर्क क्रमांक
9511857386
9673419823
9028518523