नाशिक – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर,सकारात्मक संदेश देऊन ,निसर्गाच्या प्रत्येक घटकांची नोंद घेणाऱ्या ,ग्रंथ तुमच्या दारी संचलित,निसर्गायन समूहाच्या प्रतीकचिन्हाचे अनावरण श्रावणमासारंभाच्या निमित्ताने नाशिक येथे झाले .जेष्ठ कलावंत प्रदीप वेलणकर यांच्या हस्ते हा अनावरण सोहळा पार पडला.
त्या वेळी बोलतांना प्रदीप वेलणकर यांनी आपल्याकडे असलेले ज्ञान आणि माहिती भरभरुन इतरांना देण्याचे महत्कार्य या समूहाकडून होत असल्याचे समाधान व्यक्त केले . मनापासून नैसर्गिक केलेले कार्य हे दीर्घ काळ लोकांच्या स्मरणात राहून,त्याचा उपयोग दैनंदिन जीवनात सजगपणे केल्यास निसर्ग आणि पर्यावरण याचा समतोल राखला जातो असेही ते म्हणाले
ग्रंथमित्र विनायक रानडे यांनी या समूहाची अभिनव संकल्पना मांडली.अनेक निसर्ग प्रेमींना एकत्र आणून एक यशस्वी उपक्रम त्यांनी हाती घेतला आहे. या समूहाद्वारे राबवलेल्या विविध उपक्रमाची चर्चा सर्वदूर होत आहे.
प्रतीकचिन्हाचे रेखाटन गार्गी आशुतोष दीक्षित यांनी केले आहे.निसर्गातील विविध घटकांच्या माहितीसाठी समूहाचे सदस्य होण्याचे आवाहन संकल्पक ,विनायक रानडे आणि संयोजक समीर देशपांडे यांनी केले .कोरोनाचे नियम पाळून झालेल्या या सोहळ्यात नाशिकचे लेपर्ड मॅन सुनील वाडकर,सर्प अभ्यासक मनीष गोडबोले ,अजय आगटे, प्रमोद फाल्गुने , मोनल नाईक , स्वाती टकले , सतीश टकले , मिलिंद राजवाडे , नितीन बिदलीकर , अविनाश भिडे इत्यादी अनेक निसर्गतज्ञ उपस्थित होते .
● निसर्गायन समूहाविषयी थोडेसे……..
निसर्ग जिथे चर्चिला जातो ,
निसर्ग जिथे ओळखला जातो ,
निसर्ग जिथे जोपासला जातो ,
निसर्ग तिथेच *नैसर्गिक* होतो ।।
ग्रंथ तुमच्या दारी संचलित निसर्गायन या व्हाट्सएप समूहात निसर्गात असलेल्या प्रत्येक घटकाची , पक्षी , प्राणी , निसर्गातल्या कीटकांची ,ओळख करून दिली जाते. अभ्यासपूर्ण विवेचन करणारे दिग्गज , निसर्ग रुजवणारे सुहृद , निसर्ग जगवणारे आणि जगणारे अनेक निसर्गसूत , उत्तम छायाचित्रकार , उत्तमोत्तम निरीक्षणे नोंदवणारे सदस्य ह्यांच्या सहकार्याने निसर्गायन फुलतो आहे ।
कोरोनाच्या नकारात्मक काळात निसर्गातल्या प्रत्येक घटकाला , सकारात्मक स्पर्श करायचा नाजूकसा प्रयत्न निसर्गायन करतो आहे.
● समूहाच्या प्रतीकचिन्हाबद्दल थोडेसे
निसर्गातल्या पंचतत्वांचे भान ठेवून समूहाची वाटचाल असते अग्नी , तेज , पृथ्वी , आप आणि जल या तत्वांचे अधिराज्य प्रतीकचिन्हात आढळते प्राणवायू देणाऱ्या ,वडाच्या झाडाने ती पंचतत्वे तोलून धरलेली त्यात दिसतात । त्या झाडाचे मूळ हे वाचनात ,अभ्यासामध्येच आहे असे प्रतीकचिन्ह दर्शवते ,झाडाला असलेली एक पारंबी वर्षपूर्तीला मातीशी नाते जोडेल ,प्रत्येक पर्यावरण दिनी नवीन पारंबी प्रतीकचिन्हात नव्याने रेखाटली जाईल , त्या मुळे समूहाचे वय सदस्यांना समजेल
प्रतीकचिन्हात समूहाच्या नावापुढे असलेले तीन बिंदू , न थांबणाऱ्या , अनंताच्या प्रवासाचे द्योतक आहे. वाचन आणि निसर्ग ,या संकल्पनेतून दोन गरजेच्या गोष्टींचे संलयन म्हणजेच fusion करायचा हा प्रयत्न आहे ग्रंथ तुमच्या दारी , संचलित निसर्गायन या वैशिष्ठपूर्ण समूहाची वाटचाल नैसर्गिकच असेल ही ग्वाही प्रतीकचिन्ह देते त्यानुसार ते नैसर्गिकरित्या हातानेच चितारले गेले आहे गार्गी आशुतोष दीक्षित यांनी प्रतीकचिन्ह तयार केले आहे .
● निसर्गायन समूहाचे उपक्रम
निसर्गायन या व्हाट्सअप समूहात नवीन उपक्रम राबवून ,सदस्यांना अनेक नवीन विषयांची माहिती मिळालीआणि त्याची नोंद घेतली गेली .
एक दिवस-एक विषय या उपक्रमात , खालील विषय सखोल चर्चिले गेले
● फुलपाखरू आणि पक्ष्यांना उपयोगी साधनांचा योग्य वापर – पंढरीनाथ म्हसके
● वाघ – सद्यस्थिती – विनय विलास कुलकर्णी
● टेरेस गार्डन – स्वाती टकले
● पक्षी-मालकोहा – संदीप नाझरे
● वैविध्यपूर्ण झाडं – मुक्ता बालिगा
● निसर्ग आणि मनस्वास्थ्य – विद्या मालपुरे
● गिधाड – नितीन बिदलीकर
● निसर्गातल्या औषधी वनस्पती – प्रगती भोईर
● पक्षी – कावळा – मेघना शहा
● निसर्ग आणि लालफित – स्वाती दीक्षित
● पाणी संवर्धन – अनंत कित्तूर
● जवाईतला बिबट्या – शिरीन कुलकर्णी
● निसर्गातल्या वेली – मैत्रेयी केळकर
● सह्याद्रीतील निसर्ग – किरण झंवर
● चित्रीकरणाचा निसर्ग – सार्थक कुर्डुकर
● लडाखमधील पक्षी – संजय सावळे
● लँडस्केप प्लॅंनिंग आणि आर्किटेक्चर – अपेक्षा कुटे
● घरटी पक्ष्यांची – अविनाश भिडे
● निसर्ग निरीक्षण – संजना काजवे
● रस्त्यावरील मुलांचा निसर्ग – तुषार सावरकर
● लडाखची रानफुले – सीमंतिनी नूलकर
● माकडांच्या गोष्टी – अजय आगटे
● गिर्यारोहण एक साहसी खेळ – असिफ तांबोळी
● निसर्गयोग – अनुश्री दीक्षित
● पक्षीजन्म – सीमा तंगडपल्लीवार
वरील सदस्यांनी त्यांच्या अनुभवाने आणि सिद्धहस्त लेखणीने प्रत्येक विषयाची सखोल महितो सादर केली , समूहातल्या जाणकार / जाणत्या सदस्यांनी त्यात माहितीची भर टाकली.काही विषय सामूहिकपणे , अभ्यासपूर्ण चर्चिले गेले नाकतोडा , चतुर , कॅक्ट्स , लाल रंगांची फुले , घर माशी , पक्षी-स्पून बिल , शेकरु अशा अनेक नवीन विषयांवर माहिती संकलित केली गेली.
“एक रविवार-एक संवाद”या उपक्रमाद्वारे अभ्यासपूर्ण माहितींची मालिका झूम मीटिंग द्वारे सादर केली गेली.
● पक्ष्यांचे स्थलांतर – तुहीना कुट्टी
● निसर्गातले स्वानुभव – समूह सदस्य
● भारताचा मुकुटमणी-लडाख – सीमंतिनी नूलकर
● हिमालयाचा जन्म आणि भौगोलिक लडाख – तन्मय दीपक
● दिव्यांगांचे निसर्गप्रेम – सार्थक कुर्डुकर
● ध्वनी उपचार चिकित्सा – दीपिका परमार
● नांदूरमध्यमेश्वर येथे जास्त संख्येने पक्षी स्थलांतर का करतात? – सतीश गोगटे
● माती विरहीत टेरेस गार्डन – प्रद्युम्न पंडित
● वनस्पती पंचांगाव्यतिरिक्त द्रव्ये – वैभव दातरंगे
● सायबर क्राईम – धनंजय देशपांडे (डीडी)
● सेक्युलन्ट्स – अमिता पटवर्धन
अनेक वेगळ्या विषयांवर व्याख्याने आयोजित केली गेली त्या विषयानुरूप सचित्र माहितीद्वारे अनभिज्ञ सदस्यांना , पूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न यशस्वीपणे राबवण्यात आला.समूहावरची सर्व माहितीपूर्ण माहिती फेसबुक च्या निसर्गायन समूहावर आवर्जून दिली जाते , समूहाचे ४०० च्या वर सदस्य आहेत.