अहमदाबाद: गुजरातचे भाजपाचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांनी आज आपल्यापदाचा तडकाफडकी राजीनामा दिला आहे. रुपाणीच्या राजीनाम्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे.पक्षात वेळोवेळी नेतृत्वबदल होतच असतात, असं त्यांनी मीडियाशी बोलताना त्यांनी म्हटलंय जरी असले तरी विजय रूपणींच्या राजीनाम्याचे नेमकं कारण काय ? असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.
विजय रुपाणी यांनी शनिवारी दुपारी राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला. राजीनामा दिल्यानंतर रुपाणी यांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. कोणतीही जबाबदारी दिली तरी ती मी पार पाडेल. मला ५ वर्षांसाठी मुख्यमंत्र्यांची जबाबदारी मिळाली, ही मोठी गोष्ट आहे असे विजय रुपाणी यांनी म्हटले आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या अवघ्या एक वर्षाचा कालावधी उरला असताना रुपाणी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे आता नवे मुख्यमंत्री कोण याकडे सर्वाचें लक्ष लागले आहे.
गेल्या काही दिवसांपासून गुजरात सरकारमधील नेतृत्व बदलण्याची जोरदार चर्चा सुरु होती.केंद्रीय गृहमंत्री अमित शहा गुरुवारी अचानक अहमदाबादला पोहोचले होते. त्यांच्या गुजरात भेटीबाबत कोणालाही माहिती देण्यात आली नव्हती. राज्याचे गृहमंत्री प्रदीपसिंह जडेजा, महापौर किरीट परमार आणि स्थायी समिती अध्यक्ष हितेश बारोट विमानतळावर अमित शहा यांचे स्वागत करण्यासाठी पोहोचले होते.गुरुवारी रात्री अमित शहा आपल्या बहिणीच्या घरी गेले असले तरी ते कौटुंबिक कामानिमित्त आले असावेत असे सर्वांना वाटत होते. पण आता विजय रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर अमित शाह हे कदाचित सत्ताबदलाच्या संदर्भातच गुजरातमध्ये आले होते अशा चर्चा सुरु झाल्या आहेत.
नितीन पटेल मुख्यमंत्रिपदाचे दावेदार ?
रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर गुजरातचे आगामी मुख्यमंत्री म्हणून नितीन पटेल यांच्याकडे सूत्रे जाण्याची शक्यता जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. नितीन पटेल हे गुजरातचे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत. आनंदीबेन पटेल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता तेव्हाही नितीन पटेल मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये होते. आता रुपाणी यांच्या राजीनाम्यानंतर पुन्हा एकदा त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.