📍मुंबई | २ जुलै २०२५ –Gunratna Sadavarte Threats कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी पुन्हा एकदा आपल्या परखड आणि वादग्रस्त वक्तव्यांनी राज्यातील राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांनी म्हटले की, “माझी हत्या होऊ शकते.कायदेतज्ज्ञ गुणरत्न सदावर्ते यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर 5 जुलैच्या मोर्चाच्या आयोजनाबाबत टीका केली होती. त्यानंतर आता सदावर्ते यांना धमक्या मिळत आहेत. तसेच सदावर्ते यांच्या निवासस्थानाबाहेर काही कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला असल्याचेही समोर आले आहे. यावर बोलताना सदावर्ते यांनी माझी हत्या होऊ शकते असं विधान केलं आहे, तसेच हत्येसाठी जबाबदार असणाऱ्या नेत्यांचीही नावे सांगितली आहेत.
🔹 टीकेची सुरुवात आणि धमक्यांचा पाऊस…माझी हत्या झाल्यास…(Gunratna Sadavarte Threats)
मला धमकी दिली जात आहे. हे लोक माझी व माझ्या कुटुंबाची हत्या करतील, कानाखाली मारतील. या त्यासाठी बक्षिसं ठेवलं आहे. यावर पोलिसांचा आयटी विभागने योग्य ती कारवाई करावी. माझी हत्या झाली तर राज ठाकरे आणि यांची पिलावळ ,उद्धव ठाकरे आणि वयोवृद्ध पुढारी शरद पवार हे जबाबदार असतील असं सदावर्ते यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ५ जुलै रोजी होणाऱ्या मोर्चावर टीका केल्यानंतर सदावर्ते यांना धमक्यांचे फोन, शिव्यांचा भडिमार आणि त्यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांचा गोंधळ अनुभवास आला.
ते म्हणाले:
“माझ्या लेकराबाळांना शिवीगाळ केली जात आहे. मला मारण्याच्या धमक्या मिळत आहेत. यामागे ‘राज-उद्धव-शरद’ यांची भूमिका आहे, असा मला ठाम विश्वास आहे.”
🔹 भाषाविषयक धोरणांवर सडकून टीका
सदावर्ते यांनी त्रिभाषा धोरण आणि नॅशनल एज्युकेशन पॉलिसीवर टीका करत म्हटले:
“उद्धव ठाकरे विजयोत्सवाच्या नावाखाली गरीब विद्यार्थ्यांची शैक्षणिक हत्या करत आहेत. इंग्रजी शाळांतील मुलांना १२ क्रेडिट्स आणि जिल्हा परिषद शाळांतील मुलांना फक्त ७ क्रेडिट्स – ही दुजाभावाची व्यवस्था आहे.”
🔹 चिथावणीखोर विधानांचा वाद
या पार्श्वभूमीवर **शिवसेना (उद्धव गट)**चे नेते प्रशांत भिसे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले:
“गुणरत्न सदावर्ते हे मराठी माणसावर गरळ ओकत आहेत. जो कोणी त्याच्या कानाखाली वाजवेल, त्याला मी १ लाखांचं बक्षीस देईन.”
भिसेंनी त्यांचा उल्लेख “कुरळ्या केसांचा कुत्रा” अशा शब्दांत करत,”हा माणूस आपल्याला नडल्याशिवाय गप्प बसणार नाही,” असा इशाराही दिला.
🔹 कायदेशीर कारवाईची मागणी
गुणरत्न सदावर्ते यांनी पोलीस महासंचालक आणि आयटी विभागाकडे यासंबंधी त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे.
“जे काही होईल, त्याची संपूर्ण जबाबदारी या तीन नेत्यांवर असेल. ही लोकशाहीची हत्या असेल,” असा गंभीर इशारा त्यांनी दिला.
प्रकरणाचा पुढील कायदेशीर व राजकीय परिपाक काय होईल, याकडे राज्यातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.