नाशिकमध्ये जोरदार पाऊस :तीन तासात २६.२ मिमी पावसाची नोंद
गंगापूर धरणातून १०१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग :चांदवडला बंधारा फुटला
नाशिक,दि,१९ ऑक्टोबर २०२४ – नाशिक शहरासह जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. रात्री ८ : ३० ते ११:३० या तीन तासात २६.२पावसाची नोंद करण्यात आली आहे. रात्री ८:३० नंतर जिह्यातील अनेक भागात जोरदार पावसाने हजेरी लावली रात्री १० नंतर पावसाचा जोर अधिक वाढला धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने अनेक धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे रात्री गंगापूर धरणातून १०१९ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे.
चांदवड ,सटाणा मालेगाव परिसरात परतीच्या पावसाचा जोरदार तडाखा बसला आहे. चांदवड तालुक्यात जोरदार पाउस झाल्याने तामटीचा बंधारा फुटल्याचे समजते. दरम्यान प्रशासनाकडून मदत कार्य सुरु असून काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविल्याचे वृत्त आहे.
त्याच प्रमाणे उमराणे परिसरात परसुल नदी परिसरात पूर सदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. रस्त्यांवर जास्त प्रमाणत पाणी साचल्याने दुकानांमध्ये पाणी शिरल्याचे समजते. पूर सदृश्य स्थितीमुळे उमराणे ग्रामपंचायत, ग्रामपंचायत अधिकारी यांचे कडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्याचे कळते.
नामपूर परिसरातही परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. दरम्यान या पावसाच्या तडाख्याने कांदा पिकाचे त्याच बरोबर द्राक्ष बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार आहे.