HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात शिरकाव :नागपुरात दोघांना लागण
आरोग्य खातं अलर्ट मोडवर;केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज बोलावली तातडीची बैठक
नागपूर,दि,७ जानेवारी २०२५ – चीन मध्ये धुमाकूळ घालणाऱ्या HMPV (ह्यूमन मेटान्यूमोव्हायरस) ने भारतात हजेरी लावली आहे.तर दुसरीकडे राज्यात सुद्धा या व्हायरसने शिरकाव केली आहे. या ह्युमन व्हायरसचे नागपूरात २ संशयित रूग्ण आढळले आहेत. परिणामी आरोग्य खातं अलर्ट मोडवर आले आहे, केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे. यापूर्वी कर्नाटकात २, गुजरातमध्ये २, पश्चिम बंगालमध्ये १ आणि तामिळनाडू राज्यात २ प्रकरणे समोर आली होती आता महाराष्ट्रात या व्हायरस ची एन्ट्री झाल्याने आरोग्यखाते अलर्ट मोड वर आले असून केंद्रीय आणि राज्याच्या आरोग्य मंत्र्यांनी आज तातडीची बैठक बोलावली आहे.हा व्हायरस पहिल्यापासून अस्तित्वात असल्याने नागरीकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
नागपुरात दोन संशयित रूग्ण
नागपूरमध्ये एक १३ वर्षांची मुलगी आणि एक ७ वर्षाच्या मुलीत ही लक्षणं दिसली आहे. सतत दोन दिवसांचा ताप आल्यानंतर कुटुंबाने एका खासगी लॅबमध्ये तपासणी केली असता त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. या अहवालानंतर कुटुंबाला धक्का बसला. या दोन्ही मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले नाही. त्यांच्यावर घरीच उपचार करण्यात येत आहे. त्यांची तब्येत चांगली असल्याची माहिती समोर येत आहे.