होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ : नाशिककरांसाठी एकाच छताखाली घरखरेदीची सुवर्णसंधी

१८ ते २१ डिसेंबरदरम्यान डोंगरे मैदानावर भव्य आयोजन; ४.९९% स्कीममुळे घरखरेदीला नवी उभारी

2

नाशिक, दि. ८ नोव्हेंबर २०२५ Homethon Property Expo 2025  रिअल इस्टेट क्षेत्रातील नाशिककरांसाठी वर्षातील सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखले जाणारे नरेडको आयोजित “होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५” यंदा अधिक भव्य, आकर्षक आणि नागरीकांसाठी फायदेशीर ठरणार आहे. १८ ते २१ डिसेंबर २०२५ या कालावधीत डोंगरे वसतिगृह मैदानावर हे भव्य प्रदर्शन भरवण्यात येणार असून एकाच छताखाली घरखरेदीसाठी लागणाऱ्या सर्व सुविधा, माहिती आणि प्रकल्पांची संपूर्ण शृंखला नाशिककरांना अनुभवायला मिळणार आहे.

नरेडको नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार,  नरेडको आयोजित होमेथॉनला यंदाही नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. मागील दोन प्रदर्शनात  लाखो लोकांनी उपस्थिती दर्शवली होती आणि यावर्षी हा आकडा आणखी वाढेल, .या प्रदर्शनची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री श्रुती मराठे यांची निवड करण्यात आली आहे.या महत्त्वपूर्ण प्रॉपर्टी एक्स्पोचे आकर्षण अधिक वाढवण्यासाठी आणि नागरिकांपर्यंत उपक्रमाची विश्वसनीयता पोहोचवण्यासाठी श्रुती मराठे आपली भूमिका पार पाडणार आहेत.तीच्या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला वेगळाच ग्लॅमर आणि प्रभावीता लाभणार असून घरखरेदी करणाऱ्या नागरिकांसोबत सशक्त संवाद साधण्याची संधीही मिळणार आहे

नाशिककरांसाठी घरखरेदीची मोठी संधी(Homethon Property Expo 2025)

नरेडको म्हणजे नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल, जी केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अॅण्ड अर्बन अफेयर्स अंतर्गत कार्यरत संस्था आहे. ग्राहकांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहोचवणे, बांधकाम क्षेत्रातील प्रक्रियांमध्ये पारदर्शकता वाढवणे आणि घरखरेदीची प्रक्रिया सुलभ करणे हे नरेडकोचे उद्दिष्ट आहे.

याच उद्देशाने नरेडकोतर्फे होमेथॉन एक्स्पोचे आयोजन केले जाते, ज्यात नाशिकमधील नामांकित बिल्डर्स, डेव्हलपर्स, बँका, बांधकाम साहित्य निर्माते आणि इंटिरियर कंपन्या मोठ्या प्रमाणात सहभागी होतात.

१८ ते २१ डिसेंबरघरखरेदीदारांसाठी अत्यंत महत्त्वाचे दिवस

सकाळी १० ते रात्री ८ पर्यंत खुले असणाऱ्या या प्रदर्शनात

नवनवीन हाउसिंग प्रोजेक्ट्स

परवडणारे फ्लॅट्स

प्रीमियम व्हिला

कमर्शियल प्रॉपर्टी

प्लॉट प्रोजेक्ट्स

इंटिरियर व बांधकाम साहित्य

गृहकर्जासाठी विविध बँकांच्या योजना

एकाच ठिकाणी पाहता येणार आहेत.

SBI सारख्या प्रमुख बँकेसह अनेक वित्तसंस्था ग्राहकांना त्यांच्या गृहकर्जाच्या गरजेनुसार मार्गदर्शन करणार आहेत. ग्राहकांना घर बुकिंगसाठी आवश्यक सर्व माहिती, सवलती, योजना आणि दस्तऐवजीकरण याविषयी तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन मिळणार आहे.अशी माहिती सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांनी दिली. 

४.९९% गृहकर्ज स्कीम एक्स्पोचे मुख्य आकर्षण

आगामी हॉमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ मध्ये घर खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी उपलब्ध होणार असून या वर्षीची सर्वात मोठी ऑफर म्हणून ४.९९% व्याजदराची विशेष होमलोन स्कीम जाहीर करण्यात आली आहे. ही स्कीम एक्स्पोमधील प्रमुख आकर्षण ठरणार असल्याची माहिती प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेशभाई ठक्कर यांनी दिली.

सध्या बँकांकडून गृहकर्जावर साधारण ७.७५% ते ८% व्याजदर आकारला जातो. मात्र या खास योजनेंतर्गत ग्राहकांना फक्त ४.९९% व्याज भरावे लागणार आहे. विशेष म्हणजे, या दरापेक्षा जास्त असलेले अतिरिक्त व्याज पझेशन मिळेपर्यंत बिल्डर स्वतः उचलणार आहे. त्यामुळे घरखरेदीदारांचा प्रारंभीचा आर्थिक भार लक्षणीय कमी होणार आहे.

जयेश ठक्कर म्हणाले, “चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात जे नागरिक घर बुक करतील, त्यांनाच या विशेष ऑफरचा लाभ मिळणार आहे. मोठ्या संख्येने नागरिक ही संधी साधतील आणि आपले स्वप्नातील घर बुक करतील, असा आमचा विश्वास आहे.”या योजनेमुळे प्रथमच घर खरेदी करणाऱ्यांसोबतच गुंतवणूकदारांमध्येही उत्सुकता वाढली आहे. कमी व्याजदर, आणि विविध लोकेशन्सवरील प्रोजेक्ट्स अशा आकर्षक पॅकेजमुळे हॉमथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ ग्राहकांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे.

*होमेथॉनमध्ये घर बुक करा आणि मिळवा

फक्त ४.९९% व्याजदर  

उर्वरित व्याजाचा भार पझेशन मिळेपर्यंत बिल्डर उचलेल  

योजना फक्त एक्स्पोपुरती मर्यादित  

हजारो रुपयांची बचत

ही योजना विशेषतः घर खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी अत्यंत लाभदायक ठरणार आहे. कमी दरात कर्ज मिळाल्याने EMI कमी होईल आणि घरखरेदी अधिक परवडणारी होईल. जयेश ठक्कर यांनी विश्वास व्यक्त केला की या योजनेचा मोठ्या प्रमाणात फायदा नाशिककरांना मिळणार असून अनेक जण स्वप्नातील घर बुक करण्याचा निर्णय घेतील.

भव्य डोम आणि प्रशस्त स्टॉल्स

सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल आणि अभय नेरकर यांनी सांगितले की, या एक्स्पोसाठी ५ भव्य डोम तयार करण्यात आले असून प्रत्येक बिल्डर व डेव्हलपरसाठी ८ मीटर × ८ मीटर असे प्रशस्त आणि आकर्षक स्टॉल्स उपलब्ध करून दिले आहेत. यामुळे प्रत्येक सहभागीकडे आपले प्रकल्प उत्तमरित्या सादर करण्यासाठी पुरेसे स्थान असेल.नाशिकमधील नामांकित बिल्डर्स व कंपन्यांनी या एक्स्पोमध्ये सहभाग निश्चित केला असून, नवी लॉन्चिंग्ज, प्री-लाँच ऑफर्स आणि आकर्षक सवलती हे प्रदर्शनाचे मुख्य आकर्षण ठरणार आहेत.

घर बुक करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट

होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो या प्रदर्शनात घर बुक करणाऱ्या ग्राहकांना चांदीचे नाणे भेट देणार असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले आहे.

स्पॉन्सर्सची भक्कम साथ

या वर्षीच्या होमेथॉन एक्स्पोला खालील प्रमुख स्पॉन्सर्सचे सहकार्य लाभले आहे

Title Sponsor: Deepak Builder and Developers

Co-powered by: Abh Developers & Lalit Roongta Group

Bathing Partner: Jaquar & Ceramic Traders

Virtual Reality Partner: The VR Company

VR तंत्रज्ञानाचा वापर करून ग्राहकांना प्रकल्पांचे लाइव्ह 3D अनुभव मिळणार आहेत.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मोठी टीम प्रयत्नशील

प्रदर्शनाचे समन्वयक जयेशठक्कर, सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, चेअरमन अभय तातेड, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांच्यासह मोठी टीम या आयोजनासाठी काम करत आहे.

या व्यतिरिक्त भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न साईखेकर, पवन भगुरकर, अश्विन आव्हाड, मुकुल साबु, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, प्रदीप पटेल, परेश शहा, शाम डेडिया, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदी सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

नाशिककरांसाठी वर्षातील सर्वात मोठी संधी

होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ हे नाशिककरांसाठीएकाच छताखाली घरखरेदीची सुवर्णसंधीठरणार आहे.४.९९% स्कीमच्या माध्यमातून घरखरेदीला मोठी चालना मिळणार आहे. परवडणारी घरे, टॉप बिल्डर्स, नवीन प्रकल्प, बँकांच्या ऑफर्स, VR अनुभव आणि प्रचंड सवलती यामुळे हा कार्यक्रम वर्षातील सर्वात संस्मरणीय प्रॉपर्टी एक्स्पो ठरणार आहे.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

2 Comments
  1. […] होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ : नाशि… […]

Don`t copy text!