नरेडको नाशिकचा पुढाकार; होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो मधून ‘हरित नाशिक’चा निर्धार

नाशिकमध्ये ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ साठी जय्यत तयारी ;१८ ते २१ डिसेंबरदरम्यान डोंगरे वसतिगृह मैदानावर भव्य गृहप्रदर्शन

1

नाशिक, दि. १६ डिसेंबर २०२५ Homethon Property Expo 2025 नाशिकच्या रिअल इस्टेट विश्वातील बहुप्रतीक्षित आणि महत्त्वपूर्ण उपक्रम असलेल्या नरेडको नाशिक आयोजित ‘होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५’ साठी डोंगरे वसतिगृह मैदानावर सज्ज झाले आहे. या भव्य गृहप्रदर्शनाची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आकर्षक डोम्स उभारणीसह नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे स्टॉल्स आकार घेऊ लागले आहेत.१८ ते २१ डिसेंबर २०२५ या चार दिवसांत हे प्रदर्शन नाशिककरांसाठी खुले राहणार असून, घर खरेदी, गुंतवणूक आणि रिअल इस्टेटमधील नव्या ट्रेंड्सची माहिती एकाच ठिकाणी मिळणार आहे. शहरातील तसेच राज्यातील अग्रगण्य डेव्हलपर्स, गृहप्रकल्प, प्लॉट्स, व्यावसायिक जागा आणि विविध सवलती यामुळे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळणार आहे.

यंदाच्या होमेथॉन प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ‘हरित नाशिक’ हा संकल्प. नरेडको नाशिकच्या माध्यमातून सर्व बांधकाम व्यावसायिकांनी पर्यावरण संवर्धनाचा निर्धार केला आहे. महापालिकेच्या आवाहनाला प्रतिसाद देत, प्रदर्शनाला भेट देणाऱ्या प्रत्येक नागरिकामागे एक वृक्ष लावण्याचा उपक्रम राबवण्यात येणार आहे. या चार दिवसांत जितके नागरिक प्रदर्शनाला भेट देतील, तितकी वृक्षलागवड नरेडकोच्या माध्यमातून करण्यात येऊन नाशिक परिसर अधिक हिरवागार करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.होमेथॉन प्रदर्शनाचे मुख्य समन्वयक जयेश ठक्कर आणि नरेडको नाशिकचे सचिव शंतनू देशपांडे यांनी सांगितले की, “रिअल इस्टेट विकासासोबतच पर्यावरणाची जबाबदारीही तितकीच महत्त्वाची आहे. होमेथॉनच्या माध्यमातून नाशिकच्या प्रगतीसोबत हरित भविष्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”एकूणच, होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ हे नाशिककरांसाठी घर खरेदीची संधी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारे महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार आहे.या प्रदर्शनाला नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रातून घरखरेदीदार, गुंतवणूकदार आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी संबंधित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. नाशिककरांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन नरेडकोच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष सुनील गवादे यांनी केले आहे.

नरेडको नाशिक विश्वासार्ह रिअल इस्टेट संघटना(Homethon Property Expo 2025)

नरेडको नाशिक (NAREDCO Nashik) ही नॅशनल रिअल इस्टेट डेव्हलपमेंट कौन्सिलची नाशिकमधील अधिकृत शाखा आहे. नाशिक शहरातील बांधकाम व्यावसायिक, विकासक आणि रिअल इस्टेट क्षेत्राशी निगडित घटकांना एकत्र आणून शहराच्या विकासासाठी काम करणे, हा नरेडकोचा मुख्य उद्देश आहे. पारदर्शक व्यवहार, ग्राहकहित, तसेच शासकीय धोरणांमध्ये सकारात्मक सहभाग यावर नरेडको भर देत आहे.नाशिकमधील रिअल इस्टेट उद्योगाला योग्य व्यासपीठ मिळावे, विकासकग्राहक यांच्यात थेट संवाद साधला जावा आणि घरखरेदी प्रक्रियेत विश्वास वाढावा, यासाठी नरेडको नाशिककडून दरवर्षी होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पोसारख्या उपक्रमांचे आयोजन करण्यात येते.

सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे नाशिकच्या विकासाला वेग

आगामी सिंहस्थ कुंभमेळा नाशिकसाठी विकासाची मोठी पर्वणी ठरत आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने शहरात पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विस्तार केला जात आहे. केंद्र सरकार, राज्य सरकार आणि नाशिक महानगरपालिका यांच्याकडून रस्ते, पूल, वाहतूक व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छताइतर नागरी सुविधांवर मोठी गुंतवणूक करण्यात येणार आहे.पायाभूत सुविधा वाढल्या की त्या परिसरातील मालमत्तेच्या किमती वाढणे हे स्वाभाविक आहे. त्यामुळे कुंभमेळ्यापूर्वी घर खरेदी करणे किंवा गुंतवणूक करणे भविष्यात फायदेशीर ठरू शकते, असे मत तज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे. याच पार्श्वभूमीवर होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ नाशिककरांसाठी विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.असे ही मुख्य समन्वयक जयेश ठक्कर यांनी सांगितले.

नाशिक आजही माफक दरातील घरांचे शहर

आजही नाशिकमध्ये इतर महानगरांच्या तुलनेत घरांचे दर तुलनेने कमी आहेत. १५ ते २० लाखांच्या दरम्यान १ बीएचके फ्लॅट्स उपलब्ध आहेत, तसेच ४ ते ७ रूम किचन या फ्लॅट ला सुद्धा ग्राहकांची अधिक पसंती आहे,.अशी माहिती होमेथॉनचे सचिव शंतनु देशपांडे यांनी दिली. त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी नाशिक हे घरखरेदीसाठी आकर्षक ठिकाण बनले आहे.शहराच्या मध्यवर्ती भागाबरोबरच गोविंदनगर, गंगापूर रोड, सोमेश्वर, नवश्या गणपती, सिडको, पंचवटी आदी भागांमध्येही घरखरेदीकडे नागरिकांचा कल वाढताना दिसत आहे.

ग्राहकांसाठी आकर्षक ऑफर्स आणि ५०० हून अधिक प्रोजेक्ट्स (Homethon Property Expo 2025)

होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ मध्ये ग्राहकांना अनेक आकर्षक संधी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. ४.९९ टक्के गृहकर्ज दरासारखी विशेष ऑफर ही या एक्स्पोची प्रमुख वैशिष्ट्ये असणार आहेत. यासोबतच, एकाच छताखाली ५०० पेक्षा अधिक निवासी व व्यावसायिक प्रोजेक्ट्स पाहण्याची व तुलना करण्याची संधी ग्राहकांना मिळणार आहे.नाशिकसह महाराष्ट्रातील विविध भागांतील प्रोजेक्ट्सची माहिती या एक्स्पोमध्ये उपलब्ध असणार असून, ग्राहकांना त्यांच्या बजेटनुसार आणि गरजेनुसार घर निवडणे सोपे होणार आहे. एखादा प्रोजेक्ट आवडल्यास, संबंधित बिल्डरकडून त्या प्रोजेक्टची साईट व्हिजिटची सुविधाही देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

सामाजिक बांधिलकी जपत आयोजन

नरेडको नाशिककडून सामाजिक बांधिलकी जपत या एक्स्पोमध्ये काही निवडक समाजसेवी संस्थांना विनामूल्य स्टॉल्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत. यामध्ये आदिवासी विकास मंडळाच्या माध्यमातून आदिवासी बांधवांनी तयार केलेल्या **‘साबरी प्रॉडक्ट्स’**चा समावेश आहे. यामुळे स्थानिक व आदिवासी उत्पादनांना बाजारपेठ मिळणार आहे.तसेच, BSNL कडून एक्स्पो परिसरात मोफत वाय-फायसह विविध आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत, ज्यामुळे नागरिकांना अधिक सोयीस्कर अनुभव मिळणार आहे.

नाशिकच्या रिअल इस्टेटला नवी उंची

नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्रामध्ये गेल्या काही वर्षांत लक्षणीय वाढ झाली आहे. शहरात ४० पेक्षा अधिक मजल्यांच्या इमारतींचे प्रोजेक्ट्स साकारत असून, अशा मोठ्या आणि आधुनिक प्रोजेक्ट्सना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाशिक आता पारंपरिक शहरातून आधुनिक रिअल इस्टेट हबकडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.

नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय

ग्राहकांना एकाच ठिकाणी घरखरेदीसाठी विविध पर्याय उपलब्ध करून देणे, पारदर्शक व्यवहारांना प्रोत्साहन देणे आणि नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला अधिक बळकटी देणे, हा यावर्षीच्या नरेडको होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५चा मुख्य उद्देश असल्याचे सहसमन्वयक उदय शहा (पाटील शहा हाऊसिंग कॉर्पोरेशन) यांनी सांगितले.नाशिकच्या विकासाचा नवा अध्याय लिहिणाऱ्या या भव्य गृहप्रदर्शनाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले असून, होमेथॉन प्रॉपर्टी एक्स्पो २०२५ नाशिकच्या रिअल इस्टेट क्षेत्राला नवी दिशा देईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.

स्पॉन्सर्सची भक्कम साथ

या वर्षीच्या होमेथॉन एक्स्पोला खालील प्रमुख स्पॉन्सर्सचे सहकार्य लाभले आहे

Title Sponsor: Deepak Builder and Developers

Co-powered by: Abh Developers & Lalit Roongta Group

Bathing Partner: Jaquar & Ceramic Traders

Virtual Reality Partner: The VR Company

Communication partner BSNL असणार आहे.

प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी मोठी टीम प्रयत्नशील

प्रदर्शनाचे समन्वयक जयेश ठक्कर, अध्यक्ष सुनील गवादे सहसमन्वयक उदय शाह, मार्जियान पटेल, अभय नेरकर, चेअरमन अभय तातेड, सचिव शंतनू देशपांडे, खजिनदार भूषण महाजन यांच्यासह मोठी टीम या आयोजनासाठी काम करत आहे.या व्यतिरिक्त भाविक ठक्कर, पुरुषोत्तम देशपांडे, प्रशांत पाटील, हर्षल धांडे, प्रसन्न सायखेकर, मुकुंद साबु, पंकज जाधव, ताराचंद गुप्ता, परेश शहा, राजेंद्र बागड, मयूर कपाटे, नितीन सोनावणे, शशांक देशपांडे आदी सदस्य अथक परिश्रम घेत आहेत.

Spread the love
Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!